श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरीचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हर घर तिरंगा अंतर्गत कोपरगांव शहरातील मुख्य मार्गवरुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीमध्ये विदयालयांतील स्काउट गाईड पथक,एन.सी.सी.पथक यांच्या समवेत लेझीम पथक,लाठी काठी पथक सहभागी झाले होते.या पथकातील विदयार्थीनी शहराच्या मुख्य ठीकाणी लेझीम,लाठी काठीची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन शहरातील वातावरण देशभक्तीमय करण्याचा चांगला प्रयत्न केला. या शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दीला.
या प्रभात फेरीमध्ये कोपरगांवचे तहसिलदार विजय बोरुडे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअरमन चंद्रकांत ठोळे,सचिव दीलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,जेष्ठ नागरीक मंचच्या सुधाभाभी ठोळे,स्वच्छता दुत व श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास संख्यानचे सुशांत घोडके,राजेंद्र कपोते,सुनिल फंड,महावीर शिंगी,डाॕ.अजेय गर्जेआदी सहभागी झाले होते.
या प्रभात फेरी मध्ये हर घर तिरंगा,भारत माता की जय,वंदे मातरम,आदी घोषणा नी वातावरण देशभक्तीमय झाले होते. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन निघालेली प्रभात फेरी गांधी चौक,शिवाजी रोड,सराफ बाजार,कापड बाजार ,धत्रपती शिवाजी महाराज चौक,अहींसा चौक पुढे तहसिल कचेरी समोरुन,डाॕ.गर्जे हाॕस्पीस्टल ते परत विदयालयात समारोप झाला.समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकाची माहीती दीली.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वाचे अभिनंदन केले. उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर पर्यवेक्षक यु.एस. रायतेमॕडम यांनी आभार मानले.या प्रभात फेरीमध्ये विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *