विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत धेय्यवादी बनावे:- प्राचार्य डॉ. रमेश सानप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रात झालेले बदल तसेच समाज माध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे विद्यार्थी अभ्यासू वृत्ती, प्रयत्नशीलता आणि धेय्यवाद यापासून काहीसा दुरावत चालला आहे, सकारात्मक विचार दृष्टीतून विद्यार्थ्यांनी या परिस्थितीवर मात करावी आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत धेय्यवादी बनावे असे आवाहन प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले.
येथील श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये ११ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डॉ सानप पुढे म्हणाले की, महाविद्यालयातील अनुभवी व जिज्ञासू शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा घेत स्वतःचे करिअर विद्यार्थ्यांनी घडवावे. महाविद्यालयातील शिस्त, सोईसुविधा यांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासनही दिले. सदर प्रसंगी सर्व नवीन प्रवेशितांचे बॉलपेन भेट देऊन स्वागत करण्यात आले ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पालक प्रतिनिधी श्री. प्रशांत आढाव यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकाविषयी नूतन विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विज्ञान विभाग प्रमुख प्रा. के. एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हिंगे यांनी केले तर गणित विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. मोरे यांनी आभार मानले.सदर प्रसंगी ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *