
कोपरगाव प्रतिनिधी:-
मनसे दिव्यांग सेना आयोजित श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना रेल्वे पास काढण्यासाठी भव्य शिबीर संपन्न


मंगळवार दिनांक २४/०५/२०२२ रोजी मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या आयोजनात मनसे नेते सन्माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना रेल्वे पास काढण्यासाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

हे शिबिर श्री संतोष भाऊ गंगवाल जिल्हा उपाध्यक्ष मनसे अहमदनगर उत्तर यांच्या शुभहस्ते श्री अनिल भाऊ गायकवाड तालुका अध्यक्ष मनसे कोपरगाव यांच्या मार्गदर्शनात श्री सुनील भाऊ फंड तालुका मार्गदर्शक कोपरगाव तसेच श्री सतीश कानडे सरपंच वारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले

सदर शिबिरात जवळपास 90 ते 100 दिव्यांग बंधू-भगिनींनी रेल्वे पास काढन्याचा लाभ घेतला आहे हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खालील मनसे दिव्यांग सेनेच्या कोपरगाव पदाधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली भाऊसाहेब पारखे तालुका अध्यक्ष मनसे दिव्यांग सेना मुकुंद पदे अरुण जगताप गणेश वाघ रेणुका मुंनसी आदी पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
