नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा आदर्श पायंडा…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेले ध्वजारोहण कोविड सेंटरमधे रात्रंदिवस सेवा करणाऱ्या सफाई कामगारांचे प्रतिनिधी नितीन जगताप यांचे हस्ते पार पडले,स्व.माधवराव आढाव विद्यालयातील ध्वजारोहण डॉ.सौ.गायत्री आहेर(कांडेकर)ताईंच्या हस्ते करण्यात आले.

श्री.विजय वहाडणे यांनी नगराध्यक्षपदावर आल्यापासून आजपर्यंत 26 जाने.प्रजासत्ताक दिन,15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त अपवाद वगळता दुसऱ्यांनाच ध्वजारोहण करण्याची संधी देऊन सन्मान केला. आजपर्यंत दोन वेळा शहीद जवान वीर पत्नी,माजी हवाईदल अधिकारी,स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी युनियन प्रमुख,नगरसेविका,मुख्याधिकारी,उर्दु शाळा शिक्षिका,शिपाई,शिक्षक आदींना ध्वजारोहण करण्याची संधी देऊन
आदर्श पायंडा पाडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *