
कोपरगाव प्रतिनीधी:-
माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता.



यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी “धर्मनाथबीजेचा” उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या ‘किमयागिरी’ नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्तिनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदि विघ्नें स्वप्नांत देखील होणार नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.देशभरात विविध मंदिरात दरवर्षी हा धर्मबिज सोहळा साजरा होत असतो.धारणगाव विर येथील मंदिरातही ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.निफाड तालुक्यातील धारणगाव विर या ठिकाणी दि.२ फेब्रुवारी २०२२ रोजी धर्मबीज सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती चैतन्य कानिफनाथ मंदिराचे प्रमुख फक्कड सानप महाराज यांनी दिली आहे.सकाळी मूर्ती चा अभिषेक पुजन करुन होमहवन केला जाणार आहे.दुपारी महाभंडारा देखील केला आहे.याकरिता भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या पंचवीस वर्षापासुन हा सोहळा पार पडत असुन नाशिक सिन्नर कोपरगाव निफाड येवला मनमाड आदि भागातील भाविक दर्शनासाठी या मंदिरात येत असतात.



भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे अंत्यत जागृत असे हे मंदिर आहे.सुरूवातीला छोटेसे हे मंदिर होते.फक्कड सानप महाराज अनेक वर्षापासून या मंदिराची पूजा पाठ करुन देखभाल करतात.त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेत हे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे.रंगपंचमीला दरवर्षी पायी दिडी मोठ्या संख्येने भाविक भक्तासह मढी या ठिकाणी जात असते.या धर्मबिज सोहळ्यासाठी मंदिरावर रोषणाई करण्यात आली. यामुळे या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न होते.
