

कोपरगांव प्रतिनिधी- पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात पंजाबमधील काँग्रेस सरकारने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक ढिसाळपणा केल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, (वसंत स्मृती कार्यालय) कार्यकर्त्यांनी मे. तहसीलदार यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने राष्ट्रपती महोदयांकडे कठोर कारवाईची मागणी करावी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी विजय वहाडणे, विनायक गायकवाड, प्रकाश सवाई, संजय कांबळे, वसंत जाधव, विनीत वाडेकर, किरण थोरात, प्रभाकर वाणी, योगेश वाणी, मंगेश पाटील, सुनील बंब, बाळकृष्ण भागवत इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
