साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या राज्य सचिव पदी निवड..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय ह्यूमन राईटस संस्थेचे विश्वशांतीदुत परशराम साबळे यांची अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत आसलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आसल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष इंद्रजित सिंग यांनी दिले आहे.या वेळी साबळे यांनी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ही संस्था भारत सरकार संलग्नित असुन आतंरराष्ट्रीय स्तरावर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी आवाज उठविण्याचे कार्य करत असते. येणाऱ्या काळात संबंध महाराष्ट्रभर संघटनेचे जाळे घट्ट करण्यावर भर देणार असून या पदाचा उपयोग मी समाजाच्या भल्यासाठी करणार असल्याचे मत साबळे यांनी व्यक्त केले.त्यांचा या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी पोलिस अधीक्षक के.पी. रोकडे, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापू डांगे,सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य विशाल धारणगावकर, साई शक्ती इंग्लिश मीडियम चे प्राचार्य विजय जाधव यांच्या सह निलेश देवकर, विलास चव्हाण, महेंद्र झपाटे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *