

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.१५ नोव्हेंबर रोजी एकादशी निमित्त ह.भ.प. काशीकानंद महाराज यांच्या आशिर्वादाने व प्रेरणेने साई परिक्रमा मार्गाने पदयात्रेतील सहभागी भक्तांचे आमच्या कोते कुटूंबाच्या वतीने स्वागत करण्यात आले..



प्रसंगी साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विजयभाऊ कोते पाटील यांनी आदरणीय काशिकानंद महाराज व साईभक्तांचे स्वागत करत सर्वांनी सेवेची संधी दिल्या बद्दल आभार मानले..
साईबाबांच्या शिर्डीमध्ये हरि- किर्तन भजनाचा सोहळा सुरू व्हावा या विषयी चर्चा करण्यात आली.
साईबाबांच्या आशिर्वादाने…



ह.भ.प. काशिकानंद महाराज, श्री कैलास बापू कोते, श्री विजूभाऊ कोते यांनी साईबाबांच्या या पावन भुमीत अध्यात्मिक वातावर तयार व्हावे,नविन तरूण पिढी या अध्यात्म,भजन किर्तन याकडे वळावी, शिर्डी व परिसरातील भजनी मंडळ, साईभक्त, विठ्ठलभक्त यांना एक व्यासपीठ मिळावे व या व्यासपीठाच्या माध्यमातून शिरडीतील नागरीक,महिला, तरूणवर्ग यांना या धार्मिक कार्यात सहभाग नोंदवता यावा या साठी काशिकानंद महाराज, कैलास बापू कोते, विजूभाऊ कोते व परिसरातील भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याच्या दर शुद्ध एकादशीला जाहीर हरि किर्तन- भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे, या हरि किर्तन- भजनामध्ये शिर्डी व परिसरातील भजनी मंडळ सहभागी होणार असून शिरडीतील इच्छूक साईभक्तांच्या ठिकाणी या हरि किर्तन भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे..
लवकरच या हरि किर्तन- भजनाच्या या सोहळ्यासाठी नियोजन बैठक घेण्यात येवून हा सोहळा शिर्डीमध्ये सुरू करणार आहोत याची सर्व साईभक्त, शिर्डीकर, भजनीमंडळ व अध्यात्मिक परिवाराने नोंद घ्यावी.
लवकरच श्री विठ्ठल व साईबाबांच्या आशिर्वादाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे घेतलेल्या प्लॅाटवर पदयात्रेकरू व भक्तांसाठी पालखी थांब्याची सोय साई सिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट, साई निर्माण ग्रूप व ह.भ. प. काशिकानंद महाराज यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे..
जय साईनाथ !!
