जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ विजेता…

कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर (दि.०६) ते (दि.०९) दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जिया शेख, शाळेचे प्राचार्य […]

Read More

सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार :- राजेंद्र झावरे ; विकासाच्या नव्या दिशा दाखविण्याचा निर्धार…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणतं जाहीर होईल याकडे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागलेले होते. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण घोषणा जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी आपली तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष […]

Read More

२१व्या शतकातील महाराष्ट्राची हिरकणी सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब :- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मयोगी आणि संजीवनी उद्योग समूहाचे भाग्यविधाते स्व. शंकरराव कोल्हे साहेब , पिताश्री,पुणे विद्यापीठात विधी क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्त कर्ते आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना माजी अध्यक्ष ॲड स्व. संपतराव कडू पाटील यांच्या सामाजिक सेवेच्या बावनकशी मुशीत तावून सुलाखून निघालेल्या व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष पती बिपीन दादा कोल्हे, सुपुत्र व सहकार महर्षी […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकरीता आरक्षण नुकतेच जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता सायली सोळंके निवासी उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुहास जगताप प्रशासक तथा मुख्याधिकारी […]

Read More

सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हातात आर्थिक सबलीकरणाची नवी ज्योत: 2 कोटी 61 लाखांचे कर्जवितरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटांना तब्बल 2 कोटी 61 लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. या अर्थपूर्ण उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण प्रगतीचा नवा अध्याय रचला गेला आहे. संजीवनी उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो महिलांना व्यवसाय विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाचा नवा […]

Read More

‘विकासाचा महामेरू’ गौरव ग्रंथातून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समाजाभिमुख कार्याचा अचूक वेध :- ना.छगन भुजबळ…

आ. आशुतोष काळेंच्या संकल्पनेतील उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांच्या ‘विकासाचा महामेरू’ गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या कामातून प्रशासनाला गती, निर्णयात स्पष्टता आणि जनहिताची भावना या तीन गोष्टी आवर्जून दिसून येतात. त्यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीपासून ते प्रशासनातील कुशलतेपर्यंत, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचे सुसंगत आणि वास्तवदर्शी मांडणी […]

Read More

‘सूर्यतेज’ वतीने दीपावली-पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी परिषद अहिल्यानगर जिल्हा शाखा,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, कापसे पैठणी, एच. एम. राजपाल, सुमंगल प्लायवुड, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे […]

Read More

अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्च २ टक्के संशोधकांच्या यादीत संजीवनीच्या डॉ. ए.एस. सय्यद व डॉ. पी. विल्यम यांचा समावेश…

संजीवनीच्या संशोधकांची जगात नोंद…कोपरगाव प्रतिनिधी :-संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या अशा दोन संशोधक प्राध्यापकांनी अमेरिकेत आपल्या संशोधनाचा झेंडा फडकवीला. तेथील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जगातील सर्वोच्च संशोधन असणा-या पहिल्या दोन टक्के संशोधकांची यादि प्रसिध्द केली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट […]

Read More

बचत गट चळवळीने महिला आत्मनिर्भर झाल्या:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर क्रांती लोकसंचलित साधन केंद्र कोपरगाव यांच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त मा. आ. स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या.यावेळी मनोगत व्यक्त करताना महिला बचत गट चळवळीमुळे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाल्या असे सांगून महिलांना अर्थक्रांतीची जोड मिळाल्याने कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक परिवर्तनाचे देखील दार खुले झाल्याचे मत व्यक्त […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजन गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य फुटबॉल मैदानावर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिया शेख, शाळेचे […]

Read More