स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव मोहीम सुरू,युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव मोहीम केली सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेला नवी दिशा मिळणार आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले उचलली जात असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार अनुदान मंजूर :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, तालुक्यातील २१० शेतकऱ्यांना एकूण ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपये कांदा अनुदान मंजूर झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली. या अनुदान मंजुरीबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन मंत्री जयकुमार रावल यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. कोल्हे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले […]

Read More

आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर – गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी […]

Read More

…आणि म्हणूनच झालं विरोधी पक्षाचं “शर-संधान” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-……… आणि म्हणूनच झालं विरोधी पक्षाचं “शर-संधान” यामुळे गुलाल आपलाच झाला….!

Read More

69 वी राष्ट्रीय शालेय स्तरावरील 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात भव्य आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘69 व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबददल राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे राज्यपातळीवरील ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्कारांने सन्माननीत करण्यांत आले. संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतींने कारखान्याचे संचालक रमेश आभाळे व ज्ञानेदव औताडे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी हा पुरस्कार […]

Read More

तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद निवडणूक अतिशय नाट्यमय घडामोडी घडवणारी ठरली.आदल्या दिवशी एका ठिकाणी उमेदवारी जाहीर असणाऱ्यांनी रात्रीतून दुसऱ्या पक्षात उडी मारली.नैतिकता पायदळी तुडवत आपला राजकीय स्वहेतू साध्य करण्यासाठी देशपातळीच्या अवास्तव चर्चा करणारे पंचवीस वर्षांनी नगरपालिकेत उमेदवार होणे हेच जनतेला रुचले नाही.याचा प्रत्यय निकालातून स्पष्ट होत भारतीय जनता पार्टी आणि लोकसेवा आघाडी, मित्रपक्षांना मोठे यश मिळाले आहे.यानंतर […]

Read More

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत – आत्मा मालिकचा श्रेयश भवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम…

आत्मा मालिक राज्यात अव्वल – ४६ विद्यार्थ्यांची बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड…कोपरगांव प्रतिनिधी:- मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या ४६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेही परीक्षा इयत्ता ६ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माध्यमामध्ये श्रेयश भवर हयाने प्रथम […]

Read More

कोपरगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांनाशहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून येवून नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार विजयराव वहाडणे निवडून आले होते. त्यावेळी विकासाला पाठिंबा देण्यासाठी निवडून येताच वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याही निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ७ वरून ११ झाली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासासाठी लोकसेवा आघाडीच्या ४ उमेदवारांना व […]

Read More

आमच्या विकासाच्या भूमिकेला जनतेचा अफाट प्रतिसाद, विजय निश्चित :- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून हा जनतेचा कौल आमच्या विजयाची स्पष्ट साक्ष देणारा आहे, असा विश्वास भाजपा मित्र पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचारासाठी गेल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदारांनी आम्हाला केवळ उमेदवार म्हणून […]

Read More