आजीच्या संस्कारांचा वारसा जपत शिक्षणसेवेचावसा पुढे नेत आहे :- आ. आशुतोष काळे….

राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-सौ.सुशीलामाई काळे या माझ्या आजी होत्या. त्यांच्या प्रेमळ संस्कारांनीच आम्हाला माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे मोल शिकवले. त्या केवळ आमच्या कुटुंबाच्या आधारस्तंभ नव्हत्या, तर संपूर्ण काळे परिवाराच्या मूल्यांची दिशा ठरवणाऱ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जपत शिक्षण सेवेचा वसा पुढे नेत असल्याचे […]

Read More

नामको कालव्याच्या अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठीशासनदरबारी पाठपुरावा करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातून जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या वितरिका व आणि लघु वितरीकांसाठी तळेगाव मळे आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या मात्र खरेदी झालेली नाही. त्यामुळे अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.त्याबाबत या शेतकऱ्यांनी नुकतीच आ.आशुतोष काळे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली असता जमिनीचा मोबदला […]

Read More

वडिलांच्या ‘वर्षश्राद्ध’ च्या दिवशी ‘ बाप’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कुटुंबाचा मुख्य आधार बाप असतो. बाप कधी व्यक्त होत नाही. बाप कधी रडत नाही म्हणून बापाला वेदनाच नसतात असाच सर्वांचा समज झालेला आपण पाहतो. आईवर आजपर्यंत खूप लिखाण झाले. त्यातून आई घराघरात पोहोचली. तिचा त्याग, समर्पण , वेदना प्रत्येकाला आपल्या वाटायला लागल्या. यातच बाप कुठेतरी दुर्लक्षित राहिला. बाप शिस्त लावणारा म्हणून तो कठोर वाटतो […]

Read More

आधुनिक काळात शेती क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक:-राजभवन सचिव डॉ. प्रशांत नारनवरे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महाराष्ट्राचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार राज्यात नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळात शेतीक्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यभावनाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.कृषी महाविद्यालय, पुणे येथे विकसित करण्यात येत असलेल्या वसुंधरा नैसर्गिक शेती आधारित प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व देशी गाय संशोधन व […]

Read More

वस्तूं ऐवजी विचारांचे वाण वाटणाऱ्या योग साधिका कौतुकास पात्र :- मोनीका संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:- फक्त वस्तूंची देवाण-घेवाण न करता सर्वांच्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत विचारांचे वाण देणाऱ्या योग संस्थेच्या योगसाधिका कौतुकास पात्र आहेत. असे मनोगत मोनिका संधान यांनी योग संस्थेच्या हळदीकुंकू कार्यक्रमात व्यक्त केले.वर्षभरात विविध सण उत्सवाचे निमित्ताने महिलांना एकत्र आणून त्यांच्यात आपुलकीने उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी योग संस्था नेहमी प्रयत्न करते. त्यातून महिलांच्या […]

Read More

रविवार बाजाराला शिस्तबद्ध स्वरूप; तहसील मैदानात नियोजनबद्ध भाजीपाला बाजारामुळे नागरिक, शेतकरी समाधानी….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील दर रविवारी भरणारा भाजीपाला बाजार आता अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध स्वरूपात भरवण्यात येत असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. तहसील मैदान येथे हा भाजीपाला बाजार अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने भरवण्यात आला असून, यासाठी कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सखोल […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सडे फाटा ; सडे रस्त्याचे काम पूर्ण …

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतील रखडलेली रस्त्यांची कामे मुजोर ठेकेदारांमुळे रखडली होती. आमदार आशुतोष काळे यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर चालना मिळाली आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सडे गावातील सडे गाव ते सडे फाटा या एक कि.मी.रस्त्याचे खराब झालेले काम पुन्हा डांबरीकरण करून […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड….

कोपरगाव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जानेवारीला शालेय विभागीय जितक्यांदो स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन यशोदा गुरुकुल, अरण ता.माढा जि. सोलापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ११वी विज्ञान शाखेची […]

Read More

राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाला यश ; जिल्हा बँकेचा पतसंस्थाभिमुख निर्णय :- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांसाठी अर्धा टक्का ज्यादा म्हणजेच एका वर्षासाठी ७.४० टक्के इतका आकर्षक व्याजदर घोषित केला आहे. या निर्णयाचे स्वागत करत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी आपल्या ठेवी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच गुंतवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, फेडरेशन […]

Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिष्मा, विजयाचा कोपरगावमध्ये विजयोत्सवराज्यभर भाजपा जिंकले, कोपरगांवमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव…

कोपरगाव प्रतिनिधी:-आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका निवडणुकांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हा विजय म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचा सशक्त कौल आहे.या ऐतिहासिक विजयाचा आनंद […]

Read More