
कोपरगाव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जानेवारीला शालेय विभागीय जितक्यांदो स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन यशोदा गुरुकुल, अरण ता.माढा जि. सोलापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ११वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. सप्तमी डहारे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. व तिची निवड शालेय राज्यस्तरीय जितक्यांदो स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन च्या वतीने १९ व्या ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता १४ जानेवारी रोजी आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे निवड चाचणी घेण्यात आली. सदर चाचणी स्पर्धेतून के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी जकरिया सलीम शेख याची निवड दि. २१ ते २४ जानेवारी दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. अशी माहिती के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे सर यांनी दिली. या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल को.ता.एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.अशोकराव रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपदादा रोहमारे, प्र.प्राचार्य डॉ.व्ही.सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी. आर.सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समिती चेअरमन डॉ.डी.एस.बुधवंत, क्रीडा शिक्षक श्री.मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
