कोपरगाव येथे नाईक बिल्डर्स यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बांधलेल्या ‘रचना स्क्वेअर’चे उद्घाटन व निवासी इमारतीचे भूमिपूजन आ. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे नाईक बिल्डर्स यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बांधलेल्या ‘रचना स्क्वेअर’ चा उदघाटन सोहळा व निवासी इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष मा.श्री. राजेशआबा परजणे, मा.श्री. विवेकजी कोल्हे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. काकासाहेब कोयटे, बी.एस.एन.एल.चे अध्यक्ष मा.श्री. रवीकाका बोरावके, क्रेडाईचे अध्यक्ष मा.श्री. राजेशजी ठोळे, […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील एन. सी. सी. छात्रसैनिकांची अहिल्यानगर येथील टॅंक म्युझियमला भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(स्थानिक):- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांनी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी अहिल्यानगर येथील आशिया खंडातील पहिल्या केव्हिलरी टॅंक म्युझियमला अभ्यासपूर्ण भेट दिली. सदरील टॅंक म्युझियम हे आर्मड कॉर्पस सेंटर अँड स्कूल यांच्या अंतर्गत स्थापलेले आहे.टॅंक म्युझियम मधील अधिकाऱ्यांनी एनसीसी छात्र सैनिकांना तेथे असलेल्या विविध रणगाड्यांची […]

Read More

कोयटे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावहारिक ज्ञान यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.या […]

Read More

संजीवनी यंनिव्हर्सिटी व एर्डोस रिसर्च यांच्यातील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या ; ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ञ प्राद्यापकांनी एर्डोस रिसर्च स्थापन केलेली संस्था…

कोपरगाव प्रतिनिधी :- कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रातील नवे संशोधन व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने आज ऑक्सफर्ड विद्यापिठातील तज्ञ प्राद्यापकांनी स्थापन केलेल्या एर्डोस रिसर्च संस्थे सोबत परस्पर सामंजस्य करार (एमओयु) केला. एर्डोस संशोधन संस्थेचे संशोधक व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राद्यापक प्रा.अजित जावकर आणि संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी या करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे […]

Read More

पूर्व पापाने नजर गढूळ झाल्याने विरोधकांना पाणी स्वच्छ दिसेना :- सोनल अजमेरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेने नवीन पदाधिकारी निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती दिली आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न पाणी स्वच्छता आरोग्य यावर विशेष भर दिला जातो आहे. पूर्वी प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहराला प्रचंड अस्वच्छ पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाण्याच्या फिल्टरेशन प्लांट वर असलेली वस्तुस्थिती आम्ही नगराध्यक्ष पराग संघाने स्वतः जाऊन पोलखोल केली होती. वास्तविक […]

Read More

दिलेला शब्द न पाळणाऱ्या व गलिच्छ राजकारण करणाऱ्याबरोबर तडजोड नाही :- उपसभापती गोवर्धन परजणे…

लोकप्रतिनिधी व इतर ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीबाबतचा जाहीर खुलासा करा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मोठा गाजावाजा करून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध केल्याचे सांगतात. सहकारी गटांशी गोडबोलून सभापती पद पदरात पाडून घेतात, अडीच वर्ष सभापती पदाचा राजीनामा देण्याबाबत ठरल्याप्रमाणे सहा महिने होवूनही त्याबाबत चकार शब्द काढत नाही. कार्यक्रम पत्रिका छापतांना राजशिष्टाचार न पाळता सभापतीपदाचा गैर वापर […]

Read More

नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार बोलाचीच कढी अन बोलाचाच भात :-मा.नगरसेवक मंदार पहाडे…

स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या घोषणा विरल्या हवेत, नागरिकांना मिळतय गाळमिश्रित पाणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोपरगावकरांच्या नशिबी दूषित आणि गाळमिश्रित पाणीच असल्याचे कोपरगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावरून दिसून येत आहे. शहरातील मुख्य भागांमध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. […]

Read More

मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन भूमिपूजन व विकासकामांचे रविवारी लोकार्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ तसेच विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार (दि.२९ ) मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक दीड वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री मा. जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुक्यातील समस्त […]

Read More

गरीबांच्या घराला मिळणार कायदेशीर छत : शासनाचा ऐतिहासिक निर्णय कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा, स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा वगळता राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११ पर्यंत झालेली केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे या निर्णयानुसार नियमित करण्यात येणार आहेत.यामुळे कोपरगांव मतदारसंघातील या निर्णयाच्या अखत्यारीत येणारे जागांचे प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन भुमीपुजन कार्यक्रमावर उपसभापती, संचालकांचा बहिष्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भुमीपुजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपसभापती व संचालकांनी […]

Read More