तुझ्या देखील तब्बेतीची काळजी घे; शरदचंद्र पवारांचा आमदार आशुतोष काळेंना भावनिक सल्ला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोना बाधित रुग्णांसाठी तू करीत असलेले काम अतिशय उत्तम आहे. तुझी जबाबदारी तू प्रामाणिकपणे पार पाडीत आहे मात्र या जीवघेण्या संकटात तू जशी इतरांची काळजी घेतो तशीच काळजी तुझ्या देखील तब्बेतीची घे असा भावनिक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला.आमदार आशुतोष […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये अकरा महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात..!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंतेचा विषय झाली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात अकरा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ८९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६८ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ५०७९० झाल्या असुन ११३२६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १०३१० आहे तर उपचार सुरू असलेले ८३८ आहे व मयत झालेले १७८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ मे २०२१ आज ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोरोना लसीकरण अपडेट्स:-डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:-लस साठा शिल्लक नसल्याने आज १९ मे रोजी लसीकरण सत्र बंद राहील तरी नागरीकांनी गर्दी करू नये तसेच लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील नियोजन कळवण्यात येईल धन्यवाद..!!

Read More

निघोज येथे पांडव साम्राज्य प्रतिष्ठाण श्री.संदिप पाटील वराळ व जगदंब इन्फ्रास्ट्रक्चर श्री.प्रदीप शेठ नरसाळे यांचे कडुन आरोग्य मंदिरास ५० बिसलेरी बॉक्स वाटप करण्यात आले:- स्वप्नील आतकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक१८ मे २०२१ रोजी श्री.संदिप पाटील वराळ आरोग्य मंदिर निघोज येथे जगदंब इन्फ्रास्ट्रक्चर व पांडव साम्राज्य प्रतिष्ठाण यांचे वतीने ५० बिसलेरी बॉक्स वाटप करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन श्री.सचिन पाटील वराळ,जगदंब इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक श्री.प्रदीप शेठ नरसाळे,परमेश्वर शेठ नरसाळे,संस्थापक-पांडवसाम्राज्य प्रतिष्ठाण स्वप्निल आतकर,गणेश नरसाळे,आकाश वराळ,असलम भाई इनामदार,सौरभ वराळ,डॉ.संदेशजी थोरात आदि सहकारी उपस्थित होते.

Read More

मधुमेहींसाठी मधुमेह तज्ञ डॉ.रविंद्र किवळकर यांचे फेसबुक लाईव्ह वर व्याख्यान:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना, मधुमेह व म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हा आजार होऊ नये म्हणुन काय दक्षता घ्यायची याबाबत शुक्रवार दि.२१ मे रोजी पुण्याचे सुप्रसिध्द मधुमेह तज्ञ श्री. रविंद्र किवळकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.गत १ वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केले आहे. […]

Read More

महाराष्ट्रातील पतसंस्थांची गतिमान वसुली होणेकामी गतिमान पद्धतीने वसुली दाखले मिळणार:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अधिनियम ६१ मधील कलम १०१ अन्वये थकबाकी वसुलीसाठी वसुली दाखला देण्याचे अधिकार प्राप्त झाले असून वसुली दाखला देण्यासाठी राज्य फेडरेशनचे अस्थापनेवर परसेवा अधिकारी म्हणुन श्री.प्रदीप कारभारी सानप या सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा […]

Read More

देवेंद्र फडणवीस – संकट काळात जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी लढणारा कोरोना योद्धा:- माजी मंत्री शंकरराव कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाच्या काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देवून, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालुन कोरोनाच्या संकटाने घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत.आज अनेक नेते, मंत्री घरात बसुन जपुन काम करीतआहेत मात्र फडणवीस यांनी संकटाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करून काम करीत आहेत. माणुसकीच्या नात्याने […]

Read More

सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मंजुर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये:- उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा केला.त्या केलेल्या मागणीमुळे नगरपरिषद इमारतीच्या कामासाठी निधीची मंजुरी मिळवलेली आहे.सदर मंजुर झालेल्या निधीतील रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे म्हणून हा निधी आम्ही मिळविल्याची टिमकी वाजवून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये,अशी […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला मदत:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष्याच्या वतीने आज मदतीचा हात पुढे आला.सोसिएल मीडिया द्वारे झालेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळाली प्रवरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरला आज फळे, अंडी, चिकन आणि मटण आदी पौष्टीक आहार भेट दिला, त्याच बरोबर येथून पुढे […]

Read More