
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा केला.त्या केलेल्या मागणीमुळे नगरपरिषद इमारतीच्या कामासाठी निधीची मंजुरी मिळवलेली आहे.सदर मंजुर झालेल्या निधीतील रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे म्हणून हा निधी आम्ही मिळविल्याची टिमकी वाजवून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये,अशी टीका कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. शहरवासीयांसह नगरपरिषद कर्मचा-यांची मोठी कुचंबणा होत असल्याने या इमारतीचे कामासाठी निधी मिळावा म्हणून सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांचेकडे दि.३०/५/२०१६ अन्वये पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळविला होता त्यानुसार या निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता रू.2 कोटी प्राप्त झाल्याने नगरपरिषद इमारतीच्या कामाला सुरूवात होऊन या कामासाठी टप्प्याटप्प्याने मंजुर निधी मिळणे क्रमप्राप्त आहे,त्यासाठी आम्ही निधी मिळविला म्हणणे निश्चितच नियमाला धरून नाही, केवळ दिशाभुल करून जनतेला वेडयात काढण्याचे काम केले जात आहे. यापुर्वीही या कामासाठी निधी मिळविल्याचा डांगोरा पिटवुन जनतेला वेडयात काढले, वास्तविक सौ स्नेहलाताताई कोल्हे यांनी शहरवासीयांची गरज लक्षात घेउन नाटयगृहासाठी दिनांक 17 नोहेंबर 2017 रोजी नगरविकास विभाग,शासन निर्णय क्रमांक धोरण -2017/प्र.क्र.171/नवि-16 अन्वये निधी मिळविला,नाटयगृहाच्या कामाकडे दुर्लक्ष करून सदरचा निधी प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वळवुन शहरातील नाटयरसिकांचा भ्रमनिरास केला असून निधी मिळविल्याचा कांगावा करून जनतेची दिशाभुल केली ही वस्तुस्थिती असतांना सौ कोल्हे यांच्या काळात मंजुर असलेल्या निधीतील रक्कम आम्ही मिळविली म्हणणे म्हणजे शुध्द फसवणुक असल्याची टीका श्री निखाडे यांनी केली आहे.
