वारीत साई चरित्र साखळी पारायण सोहळा उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथे साई सेवा पदयात्री मंडळ अंतर्गत साप्ताहिक साई पारायण मंडळाच्यावतीने वारीतील प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र ललवाणी यांच्या निवासस्थानी साई चरित्रातील 38 वा फिरता अध्याय पारायण वाचन सोहळा गुरुवारी(दि.20) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.वारी येथील साई पालखी पदयात्री मंडळाच्यावतीने गेले अनेक वर्ष सात दिवसीय साई चरित्र पारायण सोहळा घेऊन शिर्डीच्या दिशेने पालखी काढण्यात येते. […]

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादांच्या माध्यमातून महायुती शासनाचे पाठबळ आ.आशुतोष काळे यांच्या मागे उभे आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोपरगाव शहराच्या विकास कामांचे प्रस्ताव नगरपरिषदेच्या माध्यमातून आ.आशुतोष काळे राज्य सरकारकडे मांडतील त्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे पाठबळ राहील व भविष्यात आ.आशुतोष काळे यांच्यावर मोठी दिली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे […]

Read More

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा दणका, अहिल्यानगर जिल्ह्यातील 45 वर्षे ठाकरेंसोबत असलेला शिलेदार शिंदे सेनेत का गेला ?..

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीतील पक्षात प्रवेश केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका देत 45 वर्षे उद्धव ठाकरेंची साथ देणाऱ्याअहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे व उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव […]

Read More

कोपरगावचे लहान मोठे व्यापारी भाजपा सोबत ताकतीने उभे राहणार – संतोष गंगवाल…

मनसेचे संतोष गंगवाल यांचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश…कोपरगाव प्रतिनिधी:-मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल व दिव्यांग सेलचे जिल्हाअध्यक्ष योगेश गंगवाल यांच्यासह समर्थकांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. नगरपरिषद निवडणूक जसजशी रंगात येत आहे तसाच प्रचाराचा धडाका धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हे कुटुंबाचे सामाजिक आणि राजकीय योगदान विचारात घेऊन गंगवाल […]

Read More

लोक माझ्याकडून कामाची अपेक्षा ठेवतात आणि मी ती पूर्ण ताकदीने पूर्ण करतो:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिरायती भागाच्या १३ गावतील शेतकऱ्यांची मागील पाच दशकांची प्रतीक्षा संपली असून टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून कोपरगाव तालुक्यातील चार गावांचे ९५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असुन वितरीका क्रमांक चार मधून कोपरगाव तालुक्यातील २६८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील एकूण ३६३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्यामुळे […]

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार (दि.२१) रोजी दुपारी ४.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणार आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,आ.आशुतोष काळे उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या […]

Read More

काका कोयटे व आ.काळे यांच्याकडे अनेकांची पाठ फिरवण्याचे सत्र सुरूच, वसीम शेख यांच्यामुळे प्रभाग ८ मध्ये मिळणार बळ….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्ष आघाडीच्या विजयाची घोडदौड दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. संघटीत नेतृत्व, ठोस नियोजन आणि सर्व पातळ्यांवरील सशक्त प्रचारयंत्रणा यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा जनसंपर्क मोहीमेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या लोकप्रियतेचा थेट परिणाम म्हणून विविध पक्षा‌तील असंतोष आणि प्रवेश भाजपमध्ये सुरू […]

Read More

बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठीमहायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील येसगाव,टाकळी,खिर्डी गणेश,अंचलगाव व परीसरात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्यात दोन निरपराध व्यक्तींनी आपला जीव गमावला असून वनविभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे. परंतु कोपरगाव तालुक्यात अजूनही बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले सुरूच असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी आ.आशुतोष […]

Read More

आमच्या सरांना, भावपूर्ण श्रद्धांजली :- नारायणशेठ अग्रवाल…

के.जे.सोमय्या कॉलेजचे नाव काढतात पहिले आठवण येते ती स्व.प्राध्यापक.गो.ग वर्पे सर त्याचे दोन-तीन दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली…!स्व.वर्पे सर राज्यशास्त्र व अर्थशास्त्र चे प्राध्यापक. कॉलेज असताना दोन वर्ष मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले मी खूप भाग्यवान आहे. राज्यशास्त्राचे शिक्षण देताना केवळ पाठ्यपुस्तक हेच त्यांचा शस्त्र नव्हत प्रत्यक्ष अनुभव व व्यवहार यांची जोड घालून ते हा […]

Read More

कृषि महाविद्यालय, पुणे येथे नैसर्गिक शेती परिषद संपन्न , नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची उत्पादकता वाढून पुढची पिढी सुदृढ होईल:- मा. राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-हरित क्रांतीच्या आधी आपल्या देशातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 च्या वर होता आता तो 0.5 च्या खाली झाला आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके आणि तन नाशकांचा वापर. यामुळे शेती खर्चिक झाली असून जमीन हळूहळू नापीक होत आहे. रासायनिक औषधे वापरून उत्पादित फळे,भाज्या व धान्यांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर सारखे आजार मोठ्या […]

Read More