वारीत साई चरित्र साखळी पारायण सोहळा उत्साहात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथे साई सेवा पदयात्री मंडळ अंतर्गत साप्ताहिक साई पारायण मंडळाच्यावतीने वारीतील प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र ललवाणी यांच्या निवासस्थानी साई चरित्रातील 38 वा फिरता अध्याय पारायण वाचन सोहळा गुरुवारी(दि.20) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वारी येथील साई पालखी पदयात्री मंडळाच्यावतीने गेले अनेक वर्ष सात दिवसीय साई चरित्र पारायण सोहळा घेऊन शिर्डीच्या दिशेने पालखी काढण्यात येते. तसेच गेल्या तीन वर्षापासून साखळी स्वरूपात प्रत्येक गुरुवारी साई चरित्रातील एक अध्याय वाचन, हनुमान चालीसा, राम स्तुती पठण व आरती या प्रमाणे उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून वारी गावातील साई भक्तांच्या घरी प्रत्येक गुरुवारी अध्यायाचे वाचन करण्यात येते. त्यानुसार यावेळी चा 38 वा अध्याय हा नरेंद्र ललवाणी यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.
याप्रसंगी ललवाणी परिवाराच्यावतीने साई भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अध्यायाचे वाचन करणाऱ्या साईभक्तांना भेटवस्तू देण्यात आली. विशेष म्हणजे साईभक्त असलेले विपुल ललवाणी यांचा देखील वाढदिवस याच दिवशी असल्याने तो देखील साजरा करण्यात आला.
या फिरत्या साईचरित्र पारायण अध्यायाचे साईभक्त अशोक कानडे, अजय मेहेरे, विजय शेळके, संजय परदेशी, स्मिता काबरा, निर्मला भारुड, उषा कोकाटे, मनू कानडे, विजया निकम, रंजना मलिक, चंद्रकला कोरके, अलका टेके, बेबी टेके, कल्पना गुजर, बिंदुताई जाधव, नीता चव्हाण, विजया चव्हाण, मिराबाई जोशी, ताई तुंबारे, उषा कोकाटे यांनी वाचन केले. याप्रसंगीयाप्रसंगी गावातील साई भक्त, प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र ललवाणी, सुवर्णा ललवाणी, श्रुतिका ललवाणी, कृतिका ललवाणी व विपुल ललवाणी यांच्यासह साईभक्त व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी:-
वारीतील साखळी साई चरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित ललवाणी परिवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *