नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार बोलाचीच कढी अन बोलाचाच भात :-मा.नगरसेवक मंदार पहाडे…

स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या घोषणा विरल्या हवेत, नागरिकांना मिळतय गाळमिश्रित पाणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोपरगावकरांच्या नशिबी दूषित आणि गाळमिश्रित पाणीच असल्याचे कोपरगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावरून दिसून येत आहे. शहरातील मुख्य भागांमध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. […]

Read More

मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन भूमिपूजन व विकासकामांचे रविवारी लोकार्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ तसेच विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार (दि.२९ ) मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक दीड वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री मा. जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुक्यातील समस्त […]

Read More

गरीबांच्या घराला मिळणार कायदेशीर छत : शासनाचा ऐतिहासिक निर्णय कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा, स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा वगळता राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११ पर्यंत झालेली केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे या निर्णयानुसार नियमित करण्यात येणार आहेत.यामुळे कोपरगांव मतदारसंघातील या निर्णयाच्या अखत्यारीत येणारे जागांचे प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन भुमीपुजन कार्यक्रमावर उपसभापती, संचालकांचा बहिष्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भुमीपुजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपसभापती व संचालकांनी […]

Read More

कानकुब्जी जिलेबी कॉर्नर यांच्या परंपरेचा गोड वारसा ; जिलेबीच्या गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी:- गोरे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिलेबी गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी…जिलेबी म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही…ती आहे आयुष्याच्या वळणांची गोड कहाणी.एखादा क्षण असा उगवतो,की तो दिवस साधा राहत नाही…तो मनाच्या कप्प्यात अलगद घर करून बसतो.एखादी व्यक्ती , एखादी प्रवृत्ती , एखादं दृश्यमनावर कोरलं जातं…आणि तिथून सुरू होतं चिंतन…हळूहळू त्या चिंतनाला आकार येतो,भावनांना शब्द सापडतात,आणि शब्दांना एक ललित कलाकृतीचा चेहरा…सेवानिवृत्तीनंतर मिळालेलं […]

Read More

दामूशेठ गुजराथी यांचे काळाच्या कुपीत जपलेलं आरोग्यधन:- गोरे सर….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या मातीला एक वेगळीच ओल आहे…इतिहासाची, श्रद्धेची आणि परंपरेची .त्या ओलाव्यातच रुजलेलं एक अमूल्य रोपटं म्हणजेदामूशेठ गुजराथी यांचे आयुर्वेदिक काष्ट-औषधी दुकान.सुमारे १२५ वर्षांपूर्वी, जेव्हा कोपरगावचं अस्तित्वबिरोबा मंदिरापर्यंतच सीमित होतं…आणि त्या काळात साईबाबा यांचासुगंध वातावरणात दरवळत होता,तेव्हा दामोधरदास विठ्ठलदास गुजराथी यांनीआरोग्यसेवेचा हा दीप प्रज्वलित केला.हिंदीत ज्याला “ पनसारी की दुकान” म्हणतात,ते हे दुकान केवळ व्यापारी […]

Read More

काका कोयटे अध्यक्ष पदी तर अजित लोहाडे व सुधीर डागा यांची कार्याध्यक्ष पदी फेर निवड ; भन्साळी व कातकडे यांची उपाध्यक्ष पदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून व्यापार वृद्धी आणि बाजारपेठेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शहराची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी महासंघाकडून सातत्याने ठोस पावले उचलली जात आहेत.नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची फेर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष पदी […]

Read More

नगराध्यक्ष पराग संधान ॲक्शन मोडवर,विकास कामात गुणवत्तेत तडजोड होणार नाही…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर भागामध्ये अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित कामे सुरू करण्यात आली आहे त्याची पाहणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत जाऊन केली आहे. कोपरगाव शहराला जोडणारा त्रिशंकू भाग पूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येत नव्हता त्यासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाठपुरावा करून या भागाला शहरात जोडण्याचे काम केले. कुठलाही हद्दवाढ भाग शहरात […]

Read More

श्रीरामनवमी निमित्त कोपरगावच्या पालखी मार्गावर २५ हजारहून अधिक भाविकांना मसाला ताकाचे वाटप; संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील पालखी मार्गावरून श्रीक्षेत्र शिर्डीकडे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार (दि.२६) रोजी तब्बल २५ हजारहून अधिक भाविकांना थंडगार मसाला ताकाचे वाटप करण्यात आले.युवानेते विवेकभैय्या कोल्हे व सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम तसेच श्री साईबाबांचे पालखी पूजन […]

Read More

शर्त भंग प्रकरणात शासनाच्या निर्णयाचे आभार,नागरिकांना दिलासा :- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-महसूल विभागाच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जमिनीच्या अटींचे (शर्तभंग) किरकोळ उल्लंघन नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सुमारे ९० टक्के प्रकरणे स्थानिक पातळीवरच निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी नागरिकांना शासनाच्या कार्यालयीन प्रक्रियेत होणारा विलंब कमी […]

Read More