एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे वटपौर्णिमा हा सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘वटवृक्षाला’ भारतीय संस्कृतीत अनेक दृष्ट्या महत्त्व आहे. ‘वटपौर्णिमा’ हा सण याच झाडाशी संबंधित आहे. झाडे पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर प्रदूषकांची पातळी कमी करतात. झाडे सर्वांना […]

Read More

उज्जैन येथील विश्व आयुर्वेद परिषदेच्या गुरुकुल परिषदेत डॉ रामदास आव्हाड सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतीच उज्जैन येथे विश्व आयुर्वेद पारिषद व धन्वंतरी आयुर्वेद चिकित्सा महाविद्यालय उज्जैन तर्फे आयोजित गुरुकुल परिषदेत कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वैद्य राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड यांचा प्राणाचार्य वैद्य सन्मान पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला .उज्जैन महाविद्यालयातील जेष्ठ संहिताकार वैद्य रामतीर्थ सर आणि प्राचार्य वैद्य चौरसिया यांचे शुभ हस्ते हा सन्मान देण्यात आला […]

Read More

५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला काँक्रिटीकरणाचे भिंत उभी केली. परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात. याबाबत काँक्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे.दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे. याचा अर्थ लिकेजेस / पर्क्युलेशन आहे. […]

Read More

1 लाख 60 हजार रू.किंमतीचा अंमली पदार्थ (एम.डी.) विक्री करणाऱ्या दोन इसमांना मुद्देमालासह अटक ;विशेष पथक, गुन्हे शाखाची नाशिक शहर यांची कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-विशेष पथकातील पोलीस हवालदार 445/देवकिसन गायकर, पोअं./सानप व पोअं/बागडे यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत माहिती मिळाली की, दोन इसम बालाजी एजन्सी समोर, रविवार कारंजा, नाशिक या ठिकाणी एमडी विक्री करीता येणार आहेत.मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाई करणेकरीता मा. श्री. संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे लेखी आदेशान्वये दिनांक १९/०६/२०२४ रोजी १९ः४५ वाजेच्या सुमारास […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा, निरामय जीवनासाठी योग व प्राणायामावर आधारीत भारतीय जीवनशैली सर्वोत्तम:- माजी कुलगुरु डॉ. एन.सी. गौतम…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास त्यांचे शारिरीक व मानसीक आरोग्य उत्तम राहुन त्यांच्या एकाग्रतेत तसेच बौध्दीक क्षमतेत वाढ होते. आपली प्राचीन भारतीय जीवनशैली ही योग व प्राणायामावर आधारीत असून ती सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे आतंरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- योग दिनानिमित्त कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्था संचालित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे व शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून क्रीडाशिक्षक भीमाशंकर औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले. योग प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे ववैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी सादर केले.त्यामध्ये शिर्षासन, वृक्षासन मयुरासन, व्याघ्रासन, हनुमानासन, पूर्णचक्रासन या सारखी योगासने प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे […]

Read More

संकटमोचक बिपीन दादा शंकरराव कोल्हे:- नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या साठ वर्षांत पर्जन्य छायेतील पठारावरील कोपरगांव तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळ पाचवीला पुजला आहे .स्वत: चे गोदावरी नदी वगळता पाणलोट क्षेत्र नाही. यात उपलब्ध होणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी केंव्हाच दंडेलशाही बळावर नासिक जिल्हा आणि मराठवाड्याने पळविले आहे. यामुळे ब्रिटिशांनी केवळ कोपरगांव तालुक्यासाठी बांधलेल्या दारणा धरण आणि गंगापूर धरण कालव्यांचे मधीलआवर्तन कालावधी पंधरा दिवसांवरुन सहा महिन्यांवर […]

Read More

आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी केला सूर्य नमस्काराचा विक्रम…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण :- विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलातील ७२०० विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज १२ सूर्यनमस्कार केले. या प्रमाणे २१ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २,४७,९९,६९२ सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. या विक्रमा […]

Read More

जगण्यासाठी संपत्ती, पैसा महत्वाचा असला तरी जिवाभावाची नाती जपता आली पाहिजे:- गणेश शिंदे…

कोपरगांव प्रतिनिधी:-डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही, जगण्यासाठी आज पैसा महत्वाचा असला तरी, जिवाभावाची नाती जपता आली नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच उरत नाही म्हणून आधी नाती जपायला शिका असे उद्‌गार प्रसिध्द व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध […]

Read More