संकटमोचक बिपीन दादा शंकरराव कोल्हे:- नारायण अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या साठ वर्षांत पर्जन्य छायेतील पठारावरील कोपरगांव तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळ पाचवीला पुजला आहे .
स्वत: चे गोदावरी नदी वगळता पाणलोट क्षेत्र नाही. यात उपलब्ध होणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी केंव्हाच दंडेलशाही बळावर नासिक जिल्हा आणि मराठवाड्याने पळविले आहे. यामुळे ब्रिटिशांनी केवळ कोपरगांव तालुक्यासाठी बांधलेल्या दारणा धरण आणि गंगापूर धरण कालव्यांचे मधीलआवर्तन कालावधी पंधरा दिवसांवरुन सहा महिन्यांवर गेला. देशातील दुसऱ्या नंबरच्या मोठ्या नदीचे गोदापात्र पावसाळ्यातही कायमस्वरूपी अपवाद वगळता कोरडे रहाते .
अशा भीषण परिस्थितीत गेल्या साठ वर्षांत कर्मयोगी शंकरराव कोल्हे, नितीन दादा ,बिपीन दादा, कोल्हे यांच्यासह तीन पिढ्यांनी एकट्यांनी जो संघर्ष करून या तालुक्याला जी खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली त्याला निश्चित तोड नाही.
या कुटुंबाच वैशिष्ट्य असे की ते कोणत्याही लाभ तोट्याचा विचार न करता सर्वस्व अर्पण करीत असल्याने ते बावनकशी सोन्याचा परिस ठरले आहे.
यामध्ये बिपिन दादा कोल्हे यांनी शंभरावर जिवघेण्या संकटातून अनेकांना जीवदान दिले आहे. यापैकी गोदावरी नदीला आलेल्या महापुरात मायगांवदेवी मंदिराच्या कळसावर काही नागरिक अडकले असल्याचे समजल्यावर त्यांनी तातडीने नवी दिल्ली येथील वरिष्ठांशी संपर्क साधून लष्करी जवानासह हेलिकॉप्टर मिळवून मायगांव देवी मंदिराचे वर
हेलिकॉप्टर आणले. परंतु दोरखंडाला धरुन वर येण्याचे नागरीक धाडस करत नसल्याने बिपीन दादा स्वतः कळसावर उतरुन सर्वांना हेलिकॉप्टर मध्ये सुखरूप पोहचविल्यावर ते हेलिकॉप्टरसह कोपरगांवी सुखरूप पोहोचले.
कोपरगांव तालुक्यातील काही प्रश्न सोडविण्यासाठी नवी दिल्ली बैठकीसाठी मध्यरात्री विमानाने नवी दिल्लीस जाण्यासाठी बाहेर पडले. परंतु रस्त्यावर मोठा अपघात झाल्याचे दिसल्यावर ते गाडीतून उतरले आपल्या कपड्यांची व महागड्या गाडीतील कुशनची पर्वा न करता रक्ताळलेल्या जखमींना स्वतः उचलून गाडीतून मोठ्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारासाठी सर्वं सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि स्वतः रक्तदान केले. रुग्ण धोक्याबाहेर असे समजल्यावर त्यांनी रूग्णालय सोडले. या दरम्यान त्यांनी सर्वं घटना दिल्लीस कळवून दिल्लीस रवाना झाले. तेथे धावपळ करून वरिष्ठांशी बोलणी करुन कोपरगांव तालुक्यातील विकासाठी निधी पदरात पाडून घेतला .याच दरम्यान निळवंडे पाणी प्रश्नी रस्ता रोको आंदोलन चालू होते. यामुळे त्यांनी तातडीने पुन्हा न थांबता कोपरगांव गाठुन आंदोलनात सामील झाले. या दरम्यान तीन दिवसांची धावपळ ,अपुरी विश्रांती, अवेळी अपुरे भोजन, डायबिटीस आजार तरीही भर तळपत्या उन्हात आंदोलनात सहभागी झाले. यांचा वाईट परिणाम झाल्याने त्यांना शिर्डी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. याची राज्य शासनाने दखल घेवून तातडीने निधी उपलब्ध करून प्रलंबित काम हाती घेतले.
कोपरगाव शहराला २१दिवसाआड मिळणाऱ्या पाणी टंचाई काळात स्वतः रात्रंदिवस प्रत्येक प्रभागात फिरत संजीवनी उद्द्योग समूहाचे स्वतःचे पाणी स्वखर्चाने अविरत घरपोच पोहचविले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोपरगांव तालुका मर्चंट बॅंक अवसायानात बंद पडल्यावर यावेळी देवयानी बॅंकेच्या ठेवी अडकल्याने देवयानी बॅंकेत अनेक सहकारी पतसंस्था़च्या ठेवी अडकल्याने जन असंतोष वाढला यामुळे देवयानी बॅंकही अवसायनात निघाली. परंतु न डगमगता बिपीन दादा कोल्हे यांनी विविध प्रकारच्या अविरत परिश्रमातून या बॅंकेला केवळ वाचविले नाही तर जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध नियोजनातून विक्रमी स्वरूपात पारितोषिके मिळविली आहे.
अशा स्वरूपाच्या शेकडो घटना अपघात, रुग्णालय उपचार, सर्वं नैसर्गिक, आपत्ती महापूर धरणफुटी, भुकंप, शेतकरी आर्थिक संकट, आदी मानवी संकटात सतत कोल्हे परिवारासह बिपिन दादा आघाडीवर आहेत अशा संकटमोचक बिपीन दादा कोल्हे यांना आणि कोल्हे कुटुंबियांनांही भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी सर्वोत्तम आरोग्यदायी सुखसमृद्धीचे जावो तसेच या कोल्हे कुटुंबियांकडून यापेक्षा सर्वोच्च अत्यावश्यक देश घडविण्यासाठी ईश्वर सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *