संवत्सर ग्रामपंचायतीने तात्काळ दिव्यांग निधीचे वाटप करावे:-मुकुंद मामा काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनीधी:-
ग्रामपंचायतीने आपल्या एकण उत्पनाच्या 5 % राखिव निधी हा शासन निर्देशानुसार दिव्यांग बांधवांना ना देणे बंधनकारक आहे परंतु मागील दोन वर्षापासुन
मौजे संवत्सर ग्रामपंचाय कडुन या निधीचे वाटप झालेले नाही तरी यावर्षी तरी तो देण्यात यावा या मागणीचे निवेदन संवत्सर येथील दिव्यांग बांधवांच्या वतीने भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी मा.सरपंच ग्रामपंचायत संवत्सर यांना दिले आहे
दिव्यांग बांधवांच्या आर्थिक गैरसोई विचारात घेत विशेष तरतुद करुन प्रत्येक ग्रामपंचायतीने एकुन वार्षिक अंदाजपत्रकाला गृहित धरुन दिव्यांग बांधवांना हा निधी वाटला जावा अशी शासनाची भुमिका आहे.मात्र आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातुन हा निधी वाटपाच्या निर्णयास दिरंगाई केली जात आहे. परंतु जर
आगामी काळात आमच्या हक्काचा 5 टक्के निधी वितरीत केला नाही तर नाईलाजास्तव संवत्सर गावातील 85 ते 9O दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारती समोर आपल्या विरोधात उपोषणास बसणार आहेत आणी त्यामुळे होणार्‍या परिणामास संवत्सर ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहिल असे या निवेदनात नमुद केले आहे. यावेळी संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे,संजवनी पतसंस्था संचालक राजेंद्र परजणे,दिनेश बोरनारे,आदी ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *