
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक/चांदवड):- दि. ७ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली असून चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले व महाआरती केली.
आज दि.७ पहाटे ५.३० वाजता चांदवड येथील श्री रेणुका देवीची नवरात्रातील पहिल्या माळेची सपत्नीक महाआरती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र घालण्यात आलेली बंधने हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सर्वच मंदिरांचे दरवाजे उघडे केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन अॅड.पगार यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, सौ.संध्या पगार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा साधना पाटील,जिल्हा पदाधिकारी सुनील कबाडे, उत्तम आहेर, विजय जाधव, अनिल काळे, रघुनाथ आहेर, नगरसेवक नवनाथ आहेर, सौ.दीप्ती काळे, सौ.स्वाती वाघचौरे, सौ.अंजली पगार, सौ. जागृती पगार, कावेरी पाटील, अनिल पाटील, तुकाराम सोनवणे, कैलास सोनवणे, रौनक कबाडे, ऋषिकेश सोनवणे, सुरेश गांगुर्डे, हरिभाऊ निकम, संदीप शिंदे, प्रमोद आहेर, सागर साठे, जयदीप सावळा, संजय पाटील, शुभम पगार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळी:- चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिरात महाआरती करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, सौ.संध्या पगार.
