
कोपरगाव प्रतिनिधी : यावेळी शिवसेना तालुका प्रमूख शिवाजी ठाकरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरणावरील मंजूर केलेला अन्यायकारी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पुनर्विलोकन करून त्यात असलेल्या अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे आणि कोपरगाव तालुका प्रमुख यांच्या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि २९ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


तसेच नगर नाशिक व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात २००५ साली तत्कालीन सरकारने अन्यायकारक समन्यायी पाणी वाटप अधिनियम कायदा मंजूर केला परंतु या कायद्याप्रमाणे कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून २०१२ साली शासनाने मंजूर केलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मेंढेगिरी समिती स्थापन केली आणि या समितीने तयार केलेल्या अहवाल अहवालात जायकवाडी धरण ६५% टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडण्यात येऊ नये ही घातलेली जाचक अट तत्काळ रद्द करण्यात यावी अशी शिवसेनेची मुख्य मागणी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली सरकार आतपर्यंत नगर नाशिक जिल्ह्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला सोडत आले आहे . हे थांबले नाही तर भविष्यात मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक जिल्हा असा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे या साठी पुढील महिन्यात कपरगाव ते मुंबई पायी दिंडी काढणार आहोत . या दिंडीत सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले . मुंबईत आमचे पांडुरंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसलेले आहे, ते आपल्याला नक्कीच न्याय देतील असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला . त्याच प्रमाणे गोदावरी ऊर्ध्वखोऱ्यातील २५ टी एम सी पाण्याद्वारे २०० कोटी रुपये महसूल शासनाला मिळतो .मात्र जायकवाडी धरणातून तब्बल ११० टी एम सी पाण्याचा उपसा होऊन शासनाला एकही रुपयाचा महसूल मिळत नाही . गोदावरी खोरे मराठवाडापाटबंधारे विभागाचे अधिकारी दरवर्षी ५०० ते ९०० कोटी रुपयांचे पाणी चोरून विकत असून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
जायकवाडी धरणातून नगर व नाशिक जिल्ह्यातुन ६५ टक्के पाणी देण्यास आमचे काही दुमत नाही परंतु हे पाणी देताना नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणावर बसविलेल्या पाणी मापक यंत्राद्वारे अचूकपणे पाणी मोजून द्यावे.अशी मागणी शिवसेनेच्या उत्तर जिल्हा प्रमूख राजेंद्र झावरे यांनी यावेळी केली . झावरे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, पाणी वाटप कायद्यातील तरतुदी नुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्याशिवाय गोदावरी कालव्यातून शेतीसाठी पाणी देखील मिळत नाही त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असून शेतातील उभी पिके अनेकवेळा पाण्यावाचून जळून जातात. त्यामुळे शासनाने या कायद्यात लवकरात लवकर बदल करावा तसेच नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ६५% पाणी सोडताना पाणी मापक यंत्रातून मोजून सोडण्यात यावे तसेच शेतकर्यांसाठी असलेला पाणी मागणी अर्ज म्हणजे सात नंबर फॉर्म ऑनलाइन करण्यात यावा अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख झावरे यांनी केली या पत्रकार परिषदेसाठी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहराध्यक्ष कलविदर डडियाल, माजी शहरप्रमुख भरत मोरे, कोपरगाव विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
