
कोपरगाव प्रतिनिधी:- मागील एक ते दिड वर्षांपासून संपूर्ण जगावर करोना महामारीने थैमान घातले असून काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी झाली असली तरी गणेशोत्सव साजरा करताना जनतेने करोना ची पार्श्वभूमी वर स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या एक ते दिड वर्षांपासून संपूर्ण जगावर करोना महामारीने थैमान घातले आहे मागील काही दिवसांपूर्वी अनेकांचा या साथीच्या आजाराने बळी घेतला आहे मात्र काही दिवसांपासून थोडासा दिलासा मिळाला असून रुग्ण संख्या कमी झाली आहे असे असले तरी आजून दिलासा मिळालेला नाही त्यातच प्रशासनाने तिसऱ्या लाटेने संकेत दिले आहे
असे असले तरी सद्या सणासुदीचे दिवस असून गणेशोत्सव संपूर्ण देशात उत्साही वातावरणात साजरा केला जातो याही वर्षी शासनाने सार्वजनिक गणेश मंडळाना परवानगी नाकारली असून त्यामुळे गणपतीची आरास ढोल पथक,मिरवणुका काढता येणार नाही त्यामुळे जनतेच्या आनंदावर विरजण पडले आहे शासन प्रशासन साथीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत असले तरी जनतेने देखील या सर्व बाबींचा विचार करून गर्दी करू नये त्याच प्रमाणे गणेशोत्सव व गौरी उत्सव साजरा करत असताना आपला आनंद साजरा करावा मात्र तो साजरा करताना राज्यात मोठ्या प्रमाणावर पडणारा ढग फुटी सदृश पाऊस व करोना साथीच्या तिसऱ्या लाटेचे संकेत पहाता तसेच करोना च्या महा भयंकर मागील काही दिवसांपूर्वी अनेक कुटुंबातील सदस्यांनी आपले प्राण गमावले तसेच अनेक कुटुंबातील सदस्य सुख रूप बरे होऊन परतले असे असले तरी प्रत्येक गणेश भक्तांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे तसेच सुख हर्त्या गणरायाच्या आगमनाने संपूर्ण जगा वरील करोना महामारीचे संकट जावो अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे.
