

कोपरगांव प्रतिनिधी:- आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेसाठी व भारतीय जनता पार्टी साठी त्यागनारे भारतीय जनता पार्टी चे प्रमुख आधारस्तम्भ स्व.अटलबिहारी वाजपेयीजी यांची जयंती आज कोपरगांव शहरातील सावरकर चौक येथे साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाड़ने यानी प्रतिमा पुजन केले.
यावेळी भाजपा चे जेष्ठ मार्गदर्शक टेकचंदजी खुबानी,प्रभाकरजीवाणी,सतीषशेठ कृष्णानी,विजयराव बडजाते, भाजपा चे मा.शहराध्यक्ष विनायक गायकवाड़,संघटन सचिव योगेश वाणी,मा.तालुकाप्रमुख सुभाष दवांगे, संजय काम्बले,प्रमोद पाटील सर्,प्रकाशजी सवाई,वसंत जाधव,किरणथोरात,कैलास निकम, जेष्ठ स्वयंसेवक मुकुंराव कलकुण्डरी,गणेश शिंदे, सुरेश कांगूने,संदीप गौल आदि अनेक अटलप्रेमी स्वयंसेवक व नागरिक या प्रतिमपूजन कार्यक्रमाला हजर होते.
यावेळी टेकचंदजी खुबानी यांनी अटलजी बद्दल च्या जुन्या व त्यागी आठवणी ना उजाला देत त्यांच्या तत्वाप्रमाने भाजपा कार्यकर्ता वागला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमातचे प्रस्ताविक योगेश वाणी तर आभार प्रदर्शन विनायक गायकवाड़ यांनी केले.
