साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा, श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटल (SJS), कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ , श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले असुन शिबीरामध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, सल्ला व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १२/९/२०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. शिबिर आहे. तरी सदर शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा .असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख कलविंदर सिंग दडियाल यांनी केले आहे.या शिबिराचे उदघाटन . मा. नगराध्यक्ष,शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते होणार अाहे.या शिबिरासाठी प्रमुख उपस्थितीत.
योगेश चंद्रे साहेब तहसिलदार कोपरगांव, डॉ. कृष्णा फुलसौंदर आरोग्य अधिकारी ग्रामिण रुग्णालय,वासुदेव देसले पोलिस निरीक्षक कोपरगाव पोलिस स्टेशन कोपरगांव, डॉ. जिया शेख BAMS आयुर्वेद,राजेंद्र सालकर अध्यक्ष प्रेस क्लब कोपरगांव, बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर ,दिनार पद्मकांत कुदळे उद्योजक,भरत मोरे शहराध्यक्ष एस.टी. कामगार सेना ,अस्लम शेख विधानसभा संघटक,डॉ. नरेंद्र भट्टड श्री.जी कम्युटरराईज ब्लड लॅब, इरफान शेख जिल्हाप्रमुख शिवसेना वाहतुक, उत्तर नगर असणार आहे.या शिबिरामध्ये तपासणी करुन आवश्कता असल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रीया देखील केली जाणार आहे.मेंदूच्या ,झाडांच्या दातांच्या हदय विकाराच्या डोळ्यांच्या, युरोच्या असे सर्व रोगांचे निदान करुन आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीया केली जाणार आहे. डाॅ.अमित नाइकवाडे अस्थिरोग तज्ञ ,डाॅ.शंशाक तुसे MBBS MD ,डाॅ.निरज काळे MBBS. Ms हदय शस्त्रक्रीया तज्ञ, डाॅ.सौ.तेजश्री चव्हाण (नाईकवाडे),नेत्ररोग तज्ञ,डाॅ.विशाल काळे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.पूजा कातकडे,डाॅ.तुषार सांळुके,डाॅ.प्रशांत सगळगीळे,डाॅ मयूर गंगवाल अशा तज्ञ डाँक्टरांच्या उपस्थित तपासणी केली जाणार आहे. ठिकाण-दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळा, निवारा होयसिंग सोसायटी कोपरगाव. यासाठी कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *