कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील महत्वाच्या विविध रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी कोपरगाव नगरपरिषदेला मिळवून दिला असून या निधीतून रस्त्यांचे कामे सुरु करावीत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील उद्योग व्यवसायावर होवून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक व लहान मुलांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील या रस्त्यांसाठी प्रस्ताव दाखल करून निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा, श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते आचारी हॉस्पिटल, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते इंदिरापथ (गोकुळनगरी), श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंप),लुम्बिनी बुद्धविहार रस्ता,एस.एस.जी.एम. कॉलेज समोरील रस्ता व प्रभाग क्र. ४ मधील साईधाम रस्ता आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. मात्र आजपर्यंत या रस्त्यांचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गांभीर्याने दखल घेवून लवकरात लवकर या रस्त्यांची कामे सुरु करून नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, दिनकर खरे, कृष्णा आढाव, बाळासाहेब रुईकर, रावसाहेब साठे, जावेद शेख, संदीप कपिले, डॉ. तुषार गलांडे, अॅड.विद्यासागर शिंदे, सचिन परदेशी, प्रा.अंबादास वडांगळे, कार्तिक सरदार, राजेंद्र जोशी, अॅड.मनोज कडू, प्रकाश दुशिंग, रमेश टोरपे, राजेंद्र आभाळे, चंद्रशेखर म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट :- कोपरगाव शहरातील रस्त्यांच्या २८ कामांना आपल्या नेत्याने दिलेल्या आदेशानुसार कोल्हे गटाचे नगरसेवक आडवे आल्यामुळे रस्त्याची कामे थांबली आहेत. या रस्त्यांच्या कामांना जोपर्यंत न्यायालयीन मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हे रस्ते होणार नाही त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे. खराब रस्त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यासाठी दिलेल्या ५ कोटी निधीतून रस्त्याची कामे सुरु झाल्यास निश्चितपणे नागरिकांना होणारा त्रास काही अंशी कमी होईल.

फोटो ओळ:- आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीतून रस्त्यांची कामे सुरु करा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना देतांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
