

कोपरगाव प्रतिनिधी:-
सलून असोसिएशन इगतपुरी तालुका व नाशिक जिल्ह्याच्या वतीने घोटी ता. इगतपुरी येथील नाभिक समाज ट्रस्ट मंदिर येथे पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला.



नाभिक समाजाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.भगवान अण्णा बिडवे यांच्या आदेशाने प्रदेश संपर्क प्रमुख श्री. पंढरी आंबेकर, जिल्हा अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे, पत्रकार, इगतपुरी तालुका अध्यक्ष श्री.मच्छिन्द्र कोरडे, ऍड. सुनिल कोरडे, सरचिटणीस किरण कडवे,श्री. वैभव कोरडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. रेवणनाथ सोनवणे, इगतपुरी तालुका संपर्क प्रमुख पदी श्री. राजाराम बिडवे, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. सुनिल वाघमारे,तालुका सोसिअल मीडिया प्रमुख पदी श्री. गणेश रायकर, तालुका संघटक पदी श्री.योगेश आंबेकर, तालुका सल्लागार पदी श्री.सूर्यकांत कोरडे यांची नियुक्ती झाली असुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संत सेना महाराज मंदिरात आरती व पूजा करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.किरण कडवे यांनी केले.
