पॅराऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी जागतिक कीर्तीची:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय खेळाडूंनी पॅराऑलम्पिक स्पर्धेत सर्वाधीक 19 पदकांची लयलूट करून ५३ वर्षानंतर जगात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या सर्व खेळाडूंची कामगिरी भारतीय देशाचा गौरव आणि भूषण वाढवणारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेलो इंडिया अभियान यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.
ते म्हणाले की, क्रीडा जगताचi नावलौकिक वाढवण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे हे सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देऊन प्रयत्न करतात, अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणारे खेळाडू राज्य देशपातळीवर बक्षिसे मिळवित असतात त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळ देऊन ते पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत यापुढे कसे यशस्वी होतील याचे नियोजन सध्या सुरू आहे. भारतीय संघाने सन १९६८ नंतर प्रथमच ५ सुवर्ण, ८ कास्य ६ रौप्य अशी १९ पदके जिंकली. अमृतमहोत्सवी स्वातंत्र सोहळ्यात त्यांचे स्थान निश्चितच जागतिक कीर्तीचे असल्याचेही ते म्हणाले. ऑलिंपिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंची कामगिरी अत्यंत सरस राहिली. ग्रामीण, शहरी भागातील खेळाडूंना आवश्यक ते मार्गदर्शन दिले तर ते देखील उद्याचे जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात,. संजय युवा प्रतिष्ठान देखील या कार्यात अग्रभागी असते असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *