श्री.साईच्चरित्र पारायण सोहळा कोपरगाव तालुका परिसरात झाले पाहिजे; युवा पिढी आध्यात्मिक व धार्मिक मार्गाकडे जाऊन चुकीच्या मार्गाकडे न जाता त्यांच प्रबोधन व्हावे या निमित्ताने येवढी अपेक्षा व्यक्त करतो:- युवा नेते विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव
Up

श्री.साई सच्चरित्र पारायण सॊहळ्याची विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समाप्ती…

श्री साई चरित्र पारायण मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला आहे.साईभक्तांन मध्ये आनंदाचे वातारण होते.श्री साई चरित्र पारायण समाप्ति चा महाप्रसाद व साई स्तवंन मंजिरी 3000 पाकीटे कोरोनाचे संकटामुळे घरोघरी वाटप करण्यात आले…


कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ गेल्या पंधरा वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करत असते . सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने तसेच कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या सौजन्याने गुरुवार दि २६ ऑगस्ट २०२१ पासून कोपरगाव येथील सुवर्णकार भवन, सराफ बाजार या ठिकाणी कोरोनाचा सर्व शासकीय नियमांचे पालन करत श्री साई सच्चरित्र पारायण वर्ष सोळाव्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या सोहळ्याची आज गुरुवार दि २ सप्टेंबर २०२१ रोजी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते महाआरती करत पारायणाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी अम्रुत संजीवनी चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, मा.उपनगराध्यक्ष योगेश बागुल, अतुलशेठ काले, अनिल जाधव . माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे, तुलसीदास खुबाणी, विजय भडकवाडे, नंदकुमार विसपुते,संजय मंडलिक, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, नारायण अग्रवाल , कुणाल लोणारी, ज्ञानेश्वर (माऊली) गोसावी , भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, रवी रोहमारे, रजंन मामा जाधव, पप्पू पडियार, विनोद चोपडा, तात्या राऊत, सागर जाधव , राहुल आढाव, दत्तात्रय ऊदांवत, सजंय मंडलिक, शरद कुलकर्णी, नंदू देवळालीकर, विनायक बाविस्कर , चंदूकाका बाविस्कर, प्रकाश भडकवाडे तसेच मुंबादेवी तरूण मंडळातील सर्व सभासद व साई भक्त उपस्थित होते.

या पारायण सोहळ्यात कोविड नियमांचे पालन करत साखळी पद्धतीने ५० भाविकांनी सहभाग नोंदवला होता. या प्रसंगी आयोजकाच्या वतीने सुमारे तीन हजार भाविकांना कोरोना नियमांचे पालन करत बुंदी चा महाप्रसाद व साईबाबांचे श्री साईनाथ स्तवन मंजिरी हे पुस्तक घरपोहच देण्याची योग्य व्यवस्था मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली होती.सदर पारायण सोहळा यशस्वी संपन्न होण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या सह मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *