
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरातील स्मशानभुमी येथील अंत्यविधीच्या जाळ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून तेथे असलेल्या पाच जाळ्यांपैकी चार जाळ्या ह्या पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे . त्यावर अंत्यविधी करणे देखील अवघड होत असून त्या लवकरात लवकर बदलाव्या यासाठी मनसे प्रेणित हिंदु सम्राट संघटनेने पहाणी करुन कोपरगांव नगरपालिकेला विनंती केली आहे . परंतु सर्व प्रकार निदर्शनास आणून देवून देखील कोपरगांव नगरपालिकेला जाग येत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेणित हिंदु सम्राट संघटनेच्या वतीने दि २५/२/२०२२ पर्यंत जर त्या जाळ्या बदलण्यात न आल्यांस तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल व होणाऱ्या सर्व परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.


सदर विनंती केलेल्या निवेदनावर पुढीलप्रमाणे सह्या आहेत:-
१).सतिष आण्णा काकडे मनसे शहराध्यक्ष,
२).रघुनाथ मोहिते तालुका संघटक,
३).अनिल गाडे उपशहराध्यक्ष,
४).विजय सुपेकर उपशहराध्यक्ष,
५).बापु काकडे संस्थापक हिंदुसम्राट संघटना,
६).संजय जाधव वि.उप.श.अध्यक्ष,
७).बंटी सपकाळ वि.जि.संघटक,
८).नवनाथ मोहिते मनसे युवा नेते.
