लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर आयोजित कृष्णजन्माष्टमी राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील, “शारदा संगीत विद्यालयातील” विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, संगमनेर येथे नुकत्याच झालेल्या, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर आयोजित, कृष्णजन्माष्टमी राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील, “शारदा संगीत विद्यालयातील” विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. तब्बल दोन गटामध्ये “प्रथम क्रमांकाने विजेता” होण्याचा मान मिळवला. त्यांना विद्यालयाचे संचालक केतन कुलकर्णी, आणि दीपाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रथम क्रमांक – कु. दुर्वा अजय परीख – (गट 2 री ते 4 थी)
प्रथम क्रमांक – चि. दर्श पवन भुतडा – (गट 5 वी ते 7 वी )

विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात आले. शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन! शारदा संगीत विद्यालय, कोपरगाव*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *