
धान खरेदी व धानभरडाई प्रक्रीयेबाबत वेळापत्रकाप्रमाणेच कार्यवाही करा..!
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली धान व भरडधान्य खरेदी पुर्वतयारीच्या नियोजनाबाबत बैठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-
धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रीयेबाबत एक अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रीया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.


पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची मंत्रालयातील परिषद सभागृहात पार पडली.अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला राज्यमंत्री विश्वजित कदम, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे उपायुक्त पुरवठा तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, धानाची प्रतवारी व इतर बाबीसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल.या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते.ऑनलाईन सातबारा,बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे,धानाची गुणपत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे,धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे.याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अमंलबजावणी केली जावी.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, धान खरेदी केंद्राबाबत स्थानिक यंत्रणांनी समन्वयानी काम करावे.धान खरेदी केंद्रावर कर्मचारी,ग्रेडर,वजन काटे,धान साठवणूकीसाठी गोदामे,मॉइशर मिटर या सर्व बाबीं उपलब्ध आहेत का याचीही तपासणीही केली जावी.फक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यात यावे.धानखरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी धान खरेदी केंद्राबाबत शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का ? याबाबत संबधित यंत्रणांनी चाचपणी करावी.धान खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडरची नेमणूक करावी.सर्व गोदांमाचेही योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणताही शेतकरी धान नोंदणीपासून वंचित राहता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.
मंत्री भुजबळ म्हणाले,मिलर्स सोबत करार नामे करताना त्यांना सर्व अटी व नियम यांची माहिती देण्यात यावी.जे मिलर्स केलेल्या करारनाम्यातील अटींचे पालन करणार नाहीत त्यांच्या सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी मिलर्सकडून प्राप्त होणारा सिएमआर ची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित गुणवत्ता यंत्रणेची नेमणुक करण्यात यावी.याबाबत शासन व भारतीय अन्न महामंडळ यांचे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करण्यात यावे जेणेकरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती संबधित कर्मचा-यांना देण्यात यावे जेणेकरून गोदामाचे व्यवस्थापन या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करण्यात येवून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बारदाना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, पणन हंगाम २०२०-२१ साठी ज्वारी, बाजरी, गहू, मका व रागी या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व अंदाजीत उत्पादन याबाबत योग्य माहिती घ्यावी जेणेकरून केंद्र शासनास भरडधान्याच्या बाबतीतील माहिती कळविण्यात येईल. भरडधान्याची प्रत व गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

