कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रद्धा आणि सबुरी संदेशाने साईबाबांचा महिमा जगभर पोहोचला आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण परिसरातील कारवाडी येथे नव्यानेच साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कोरोना नियम पाळून घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. साईकथाकार ह भ प अरुण महाराज रोहोम यांची संपूर्ण सप्ताहभर साईकथा झाली. ह भ प रामायणाचार्य मोहिनीराज महाराज लोंढे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. ह. भ. प. विकास महाराज गायकवाड यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य सावळीविहीर येथील पंडित सुधाकर पांडे गुरुजी यांनी केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, बाजार समिती सभापती संभाजीराव रक्ताटे, बाबासाहेब लोंढे, शंकर रोहम, विलास पानगव्हाणे, सरपंच संदीप वाबळे (रुई), आशिष आगलावे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अशोक लोंढे, प्रमोद पानगव्हाणे, राकेश त्रिभुवन, उमेश लोखंडे, रोहित थोरात, विजय लोंढे, प्रवीण रोहम, बाळासाहेब हाडोळे, माधवराव बारहाते, संतोष रक्ताटे, संपतराव लोंढे, श्याम रोहम, विजय काशीद, ऋषिकेश लोंढे, शरद पवार, प्रशांत रक्ताटे, शंकर रक्ताटे, ज्ञानेश्वर लोंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठानच्या भूमीत पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर, कच देवयानी अख्यान, ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांची तपश्चर्या आणि शेजारी संत जनार्दन स्वामींचे समाधी मंदिर, आदी मुळे हा परिसर संत, महंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून शेजारीच शिर्डीचे साईबाबा मंदिर यामुळे या भागाचे महत्त्व संपूर्ण जगात पोहोचले आहे. कारवाडी चे साईबाबा मंदिर कोकमठाण परिसराची नवचेतना ठरणार असून यातून धार्मिक व मानवतेची अखंडता सातत्याने टिकून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी अशोक लोंढे यांनी आभार मानले.

फोटो ओळी:-कोपरगाव
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण परिसरातील कारवाडी येथे नव्याने साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला याप्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व पंचक्रोशीतील साईभक्त उपस्थित होते.
