भारतीय जनता पक्षाचे संघटन तळागाळात पोहोचवून ज्याप्रमाणे आपण गावगाडा सांभाळतो, त्याप्रमाणे भाजपा बूथ प्रमुखाचे कार्य हे महत्त्वाचे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय जनता पक्षाचे संघटन तळागाळात पोहोचवून ज्याप्रमाणे आपण गावगाडा सांभाळतो, त्याप्रमाणे भाजपा बूथ प्रमुखाचे कार्य हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केले. केंद्र, बूथ व शक्ती प्रमुखांनी आपापल्या भागात संपर्क करून भाजपा संघटन मजबूत करावे असेही त्या म्हणाल्या.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा परिसरातील पुणतांबा, जळगाव, वाकडी, चितळी, शिंगवे, रामपूरवाडी, धनगरवाडी, यलमवाडी येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत बैठका घेण्यात आल्या त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
याप्रसंगी गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे किसनराव बोरबने, रामनाथ चौधरी सर्जेराव जाधव, भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र बाभुबळके, उपसरपंच प्रशांत काळवाघे (शिंगवे), रामभाऊ बोरबने, पुणतांबा ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ विजया बोरबने, सरपंच संदीप सुरडकर(रामपूरवाडी), सुभाषराव सांबारे, गणीभाई शेख, बबनराव काळे, दादाभाऊ सांबारे, डॉ. अविनाश चव्हाण, पूनम बोरबने, जयवंत शिंदे, संजय शेळके, राजूनाना लहारे, संभाजीराव गमे, बाळासाहेब वाघ, विक्रम वाघ, आदी उपस्थित होते. प्रारंभी पुणतांबेचे माजी सरपंच सर्जेराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात यांनी समर्थ बूथ अभियान संदर्भात माहिती देत पक्ष संघटन कसे वाढावे याबद्दल मार्गदर्शन केले.
दादासाहेब सांबारे यांनी पुणतांबा जंक्शनला एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, रेल्वे भूसंपादन संदर्भात तक्रारी आहेत त्याचे मार्गदर्शन व्हावे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, कोपरगाव पुणतांबा रस्ता व्हावा, शिवनाथ साळुंखे यांनी आदिवासी समाजाचे सायफन विद्युत मोटार दुरुस्त करून मिळावी म्हणून मागणी केली. तर रामपूरवाडीचे दत्तात्रय सांबारे म्हणाले की, पुणतांबा वीज उपकेंद्रiतून फक्त दोन तास वीज मिळते त्यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमीत वीज पुरवठा व्हावा अशी मागणी केली.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, तत्कालीन देवेंद्र फडणवीस शासनाने पुनतांबा, कोकामठाण पाणी योजनांसाठी शासन निर्णयात बदल करून शेती महामंडळाची शेत जमीन दींल्याने हे प्रश्न मार्गी लागले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खुर्ची असते, ते सुटले नाही तर त्याला कुठलीही किंमत राहत नाही. आज मतदार संघातील पाणी, शेती, वीज, आरोग्य, आदी प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनले आहेत, मतदार हैरान झाले आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. खरीप पिकांची वाट लागली आहे, शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळत आहे. राज्य शासन जुगाडात व्यस्त आहे. पुणतांबा दहा गावात पुणतांबा परिसरातील दहा गावांच्या असंख्य समस्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत वर्षानुवर्षे प्रलंबित असताना त्या सोडऊन त्याला निधी मिळवत प्रश्न मार्गी लावत पुढील पंचवीस वर्षाचा विकास आराखडा तयार केला आहे. शेवटी दादासाहेब सांबारे यांनी आभार मानले.

चौकट:-
ज्यांनी आपला विश्वासघात केला, त्यांचा आत्मघात झाला असे सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.

फोटो ओळी:-
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा परिसरातील १० गावात भाजपा समर्थ बूथ अभियानात मार्गदर्शन करताना प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *