“जागतिक आदिवासी दिन कोपरगावात मोठ्या उत्साहाने साजरा केला..!”

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक. ९ ऑगस्ट २०२१रोजी सकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळेस समाजाचे ज्येष्ठ नेते मारुती साबळे व महारु चव्हाण सर यांचे शुभहस्ते करण्यात आली .यावेळेस समाजाला प्रबोधन करतांना श्री अमित आगलावे जिल्हाध्यक्ष आदिवासी महादेव कोळी युवक संघटना जिल्हा शाखा अहमदनगर हे म्हणाले की “आदिवासी समाजाने स्वराज्याच्या लढाईत बलिदान दिलेले असून स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा आपले समर्पण दिले आहेत.

आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा असून तो कोणालाही मारक ठरलेला नाही .तरीसुद्धा स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे होऊन ही आदिवासी समाजाची म्हणावी अशी प्रगती झालेली नाही. यावेळी आदिवासी समाजाला कोपरगाव तालुक्यामध्ये माननीय आमदार आशुतोष काळे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खावटी अनुदान प्राप्त करून दिले. त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .तसेच कोपरगाव तालुक्यातील 40 हजार पेक्षा जास्त आदिवासी समाजाला विविध वैयक्तिक व सामायिक योजना घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर ता. अकोले या ठिकाणी जावे लागते . एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांचे उपशाखा शिर्डी या मध्यवर्ती ठिकाणी व्हावी जेणेकरून उत्तर नगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना त्याचा लाभ घेता येईल .अशी मागणी शासनाकडे करण्याचे ठरले .त्याच बरोबर महादेव कोळीसमाजाच्या स्वराज्यासाठी बलिदानाची साक्ष देणारे स्थान असलेल्या शिवनेरी किल्ला परिसरातील “महादेव कोळी चौथरा” व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जन्मगाव असलेल्या देवगाव तालुका अकोले या दोन्ही तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्राचा “अ” दर्जा देऊन. त्याचा महाराष्ट्र शासनाने विकास करावा .अशी मागणी या वेळेस करण्यात आली व अकोले येथील विल्सन डॅम अर्थात भंडारदरा धरण यास आज जागतिक आदिवासी दिन निमित्ताने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नामकरण करण्याचा सोहळा संपन्न होत आहे त्यास समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला व मान्यवरांचे अभिनंदन व्यक्त केले गेले.यावेळेस बोलतांना मा. श्री सुनील पोरे सर म्हणाले की “आदिवासी समाजातील प्रत्येकाने उच्च शिक्षण घेऊन समाजाचे प्रबोधन करावे व उच्च अधिकारी बनून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर देश हिता बरोबर समाजासाठी हि करावा. यावेळेस मनोहर शिंदे ,भरत आगलावे, गोविंद आढळ अशोक उंडे शरद शिंदे, देवराम साबळे, सुनील पोरे ,नंदू लांडगे ,शिवाजी वळवी, श्री चौरे सर, सखाराम घोडे ,विठ्ठल राव शेजुळ चंद्रकांत शेजुळ वैभव आगळे यांसह महिला व तरूण समाज बांधव उपस्थित होते .सर्वांचे आभार गोविंद आढळ यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *