
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याची निर्मिती झाल्यापासून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्यासाठी जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना ६१,८७,०००/- रुपयांचे धनादेश नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांना देण्यात आले असून खोपडी व इतर गावातील प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांना ८ कोटी ४० लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येताच आमदार आशुतोष काळे यांनी लौकी येथे बाधित शेतकरी व नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या जिमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या सर्व अधिकारी, भु-संपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी फक्त सोडविलाच नाही तर शेतकऱ्यांना २०१३ च्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार भरपाई मिळवून दिली आहे. ज्याप्रमणे समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पबाधितांना त्याच्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे त्याप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. १ व २ साठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. अनेक वर्षापासूनचा प्रश्न सोडवून न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. घोयेगाव, गोधेगाव, तळेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावातील उर्वरित बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शिवाजीराव शेळके,राजेंद्र खिलारी,दिगंबर जाधव,अजीनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक, रामदास खटकाळे, भाऊसाहेब गोडसे, निवृत्तीराव भवर, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे बाळासाहेब वारकर, भूमी अभिलेख विभागाचे संजय भास्कर आदी उपस्थित होते.
चौकट :- आमदार आशुतोष काळेंचे पूर्व भागातील बाधित शेतकऱ्यांसाठी मिळालेला मोबदला हे आमच्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी अत्यंत कमी वेळेत आमचा प्रश्न मार्गी लावला यावरून त्यांना तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची आहे.आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने आम्हाला पांडुरंग पावला असल्याच्या प्रतिक्रिया प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

फोटो ओळ:-
नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालव्यासाठी जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश प्रदान करतांना आमदार आशुतोष काळे.
