
राष्ट्रीय पातळीवर संजीवनीच्या महेश जावळेचा ५८ वा रॅन्क..!
कोपरगांव प्रतिनिधी:-
नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नाईपर) या संस्थेने बी. फार्मसी नंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या नाईपर-जेईई २०२१ या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचे १० विद्यार्थी ऑल इंडिया रॅन्क मध्ये चमकले असुन महेश परसराम जावळे याने संपुर्ण भारतातुन ५८ वा रॅन्क मिळविला आहे. या अवघड परीक्षेत संजीवनीचे १० विद्यार्थी चमकावे, ही बाब संजीवनी सारख्या ग्रामीण भागातील संस्थेला भुषणावह आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की नाईपर-जेईई प्रवेश पात्रता परीक्षेसाठी ३ जुलै, २०२१ ला घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत देशातुन ४८०० विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमाविले. मुळात ही परीक्षा देण्यासाठी गेट अथवा जीपॅट स्कोर विचारात घेतला जातो. संजीवनीच्या १० विद्यार्थ्यांकडे हा स्कोर होता म्हणुनच ते या परीक्षेसाठी पात्र ठरले. नाईपर-जेईई प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे. कंसात त्यांचा ऑल इंडिया रॅन्क आहे. महेश परसराम जावळे (५८), पवन बाळक्रिष्ण कलन (९५), सुरेश कुशाहारी शिंदे (९७), चेतन बिरू जानराव (१४४), शुभम महारूद्रप्पा कावरे (३०६), शैलेश विलास मतसागर (५६४), वैभव उत्तमराव लासुरे (५६६), क्रिष्णा प्रशांत धोर्डे (९५१), जय अनिल गागरे (१६०२) आणि कार्तिकी अशोक वानखेडकर (१६४५).
भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे भारतात ८ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये नाईपर-जेईई प्रवेश परीक्षा उत्तिर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना कौन्सिलिंग रावुडद्वारे एम.एस. (फार्मसी), एमबीए (फार्मसी), एम. टेक (फार्मसी) व एम. फार्मसी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. याचबरोबर प्रत्येकी रू १२४०० प्रति महिना इतके स्टायपेंडही त्यांना मिळणार आहे. संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयात सर्वच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. यामुळेच राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश स्पर्धा परीक्षेत संजीवनीच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे व प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे यांचे अभिनंदन केले.
१).महेश जावळे

२).पवन कलन

३).चेतन जानराव

४).सुरेश शिंदे

फोटोः- पहिल्या चार टाॅपर विद्यार्थ्यांचे फोटो
