
कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस कधी कष्टाला घाबरत नाही खरतर कष्ट माणसाच्या पाचविलाच पुजले जातात असे म्हणतात की सटवाईचा टाक कुणाला पुसता येत नाही म्हणून काहिंचया नशिबी बालपणापासून कष्ट आलेले असतात याची प्रचिती अनेकदा येते शासनाने बालकामगार प्रतिबंध कायदा केला पण
कौटुंबिक आर्थिक संकटाचा सामना करत जीवन जगत असताना अनेक लोक परीस्थितीवश होवून शालेय विद्यार्थ्यांना कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करतात ज्या वयात स्वछंदिपणे खेळायचे बागडायचे शिक्षण घेत असताना भविष्याचा विचार करायचा त्या वयात अतोनात कष्ट करण्यात दिवस काढावे लागतात तरीसुद्धा कष्टातहि सुखाचे क्षण शोधून आनंद साजरा करण्यासाठी मन मोकळे असाव लागते अशा एका क्षणासाठी आसुसलेल्या दोन मैत्रिणी छायाचित्रात दिसत आहे रस्ता खडीकरण सुरू असताना दोन गुलाबी फुले सापडली एक शालाबाह्य दुसरी सातविची विद्यार्थीनी पण लाॅकडाऊनमुळे शाळा बंद घरची परिस्थिती बेताची आई-वडील विटभटटी कामगार आर्थिक संकटाचा सामना करत जीवन जगत असताना परीस्थिती वश होवून कष्टाची तयारी तरीसुद्धा आनंद साजरा करून मानसिक समाधान शोधत श्रमपरिहार करतानाचे क्षण प्रगततंत्रज्ञानाचे युगात मोबाईल मुळे फोटोग्राफी सोपी झाली सेल्फी मुळे आनंदाचे क्षण टिपणे सुलभ सोपे झाले आणि माणसाला असे सुखाचे क्षण शोधून आनंद साजरा करता आला पाहिजे कष्टावर मात करीत सुखासमाधानाने जगता आले पाहिजे सोबतच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे प्रमाणे खडीचया खडतर कष्टाची कामे करताना श्रमपरिहार करतानाचे छायाचित्र हेमचंद्र भवर यांनी चित्रीत केले आहे.
