भावी नागरिक आजच घेता हे सुदृढ ,आरोग्यदायी भविष्याची जबाबदारी:- सौ.संगीता मालकर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकताच 5 जून जागतिक पर्यावरण दिन श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरा केला .शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत शाळेच्या शिक्षिका सौ संगीता मालकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिन साजरा करण्याबाबत व तसेच वृक्षारोपण याबाबत मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळातऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लाखो लोकांचे बळी गेले. O2 चे बेड काय असते? ते नाही मिळाले तर काय होते? कुठली आपत्ती ओढवू शकते ?हे सर्व या चिमुकल्यांनी या काळात अनुभवले .भविष्यात ही वेळ कोणावरही येऊ नये . पर्यावरणाचा समतोल राखला जावा .त्याचबरोबर जमिनीची धूप थांबावी .यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व त्याची काळजी घ्यावी त्याचे संगोपन करून झाडे वाढवावी .तरच भविष्यात भरभरून शुद्ध, स्वच्छ हवा मिळवून आरोग्य उत्तम राहील .शिवाय सर्वात महत्वाचा संदेश या मुलांनी दिला की झाडे परजीवी नसतात. ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात व आपल्या मूलभूत गरजांची पूर्ती करतात. म्हणूनच हे बालचमू म्हणतात_ एक झाड लावू मित्रा ,
त्याला पाणी घालू
मोठे झाल्यावर
त्याच्या सावलीत खेळू .
एक झाड लावू मित्रा
त्याला रोज पाहू
त्याची गाणे गाता गाता
मोठे मोठे होऊ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *