माणसे जवळ हवीत:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एकीकडे दिवसाला शेकडो -हजारो माणसं भेटतील पण मनाच्या अंतरंगात बोलण्यासाठी जवळच कोणीच नसावं .. याची सल मनाला कायम बोचत असते . प्रत्येक मनाला व्यक्त व्हायचं असतं , पण व्यक्त होण्यासारखं समोरच्या व्यक्तीच व्यक्तिमत्व नसतं .. मन हलकं करणारी व बोलणारी माणसं आजच्या क्षणाला जवळ हवीत.कधी कसा , कोणता क्षण आणि प्रसंग माणसांवर येईल हे सांगता येणे अशक्य आहे . त्या प्रसंगांना आणि संकटांना निर्भिडपणे सामोरं जाण्याच आत्मबळ देणारी माणस जपायला हवीत . माणसांचं जवळ असणं आणि एकमेकांना जपण आजच्या काळात खूप गरजेचं झालंय . एक वेळ पैशानं आणि संपत्तीने श्रीमंत असणारी माणसं जवळ नसली तरी चालेल मात्र मनानं श्रीमंत असणारी आणि संकट काळात मदतीचा हात देणारी माणसं जवळ असावीत … पटतंय का ?

सुलेखन – गोरेसर:-
9850 613 612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *