छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीर संपन्न झाले:- स्वप्निल आतकर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक ०३-०६-२०२१ रोजी निघोज येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन समस्त ग्रामस्थ निघोज यांचे वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १०० युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले होते.


रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी श्री.संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष श्री.सचिन पाटील वराळ,राष्ट्रीय कुस्तीपटू पै. अमोल लंके,मनसे सहकार सेना उपजिल्हाध्यक्ष श्री.अतुल वरखडे,प्रतिष्ठानचे संस्थापक स्वप्निल आतकर,अध्यक्ष हर्षद इधाटे,उपाध्यक्ष ऋषिकेश तनपुरे, सचिव आबु तांबोळी,अक्षय भंडारी,ग्रामपंचायत सदस्य असलम इनामदार,किरण रसाळ,पृथ्वी कोल्हे, सौरभ वराळ,प्रेम पानमंद,सिद्धार्थ सोनवणे,लहू निचित,विशाल जगदाळे,आकाश वराळ, रोहित रसाळ,सौरभ रसाळ,अजय शेळके संकेत लाळगे,शुभम शेवाळे,शिवम गायखे
मोन्या सोनवणे,प्रथमेश सोनवणे,निलेश सोनवणे,प्रविण वराळ,अभिषेक पंचरास, नारायण भालेकर आदि सहकारी उपस्थित होते.


या रक्तदान शिबीरासाठी पांडवसाम्राज्य प्रतिष्ठाण, श्री.संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन,महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका, भंडारी जेनेरिक मेडिकल यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच यासाठी अक्षय ब्लड सेंटर हडपसर पुणे उपलब्ध झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *