
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्र सह संपूर्ण देशात थैमान घातले असून तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील या लाटेत वाढले आहे. त्याच बरोबर ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट कदाचीत लहान मुलांना घातक ठरू शकते,त्यासाठी प्रशासनाने आधीच सज्ज राहावे व लहान मुलांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त बेड व इतर वैद्यकीय साधनांची उपलब्धता करून लहान मुलांच्या डॉक्टरांची व कोविड योध्यांची बैठक घेऊन लहान मुलांना संसर्गापासून कसे रोखता येईल याचे नियोजन करावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजाभाऊ झावरे यांच्या आदेशानुसार शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,मा.शहरप्रमुख अस्लमभाई शेख,भरत मोरे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख ईरफान शेख, उपशहरप्रमुख गगन हाडा,शिवसैनिक अमित भास्कर यांनी मा.तहसिलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले.
यावेळी अस्लम शेख यांनी शहरातील छोट्या व्यापा-यांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी हि विनंती केली. तहसिलदार योगेश चंद्रे यांनी कोपरगाव शिवसेनेच्या जनहितासाठीच्या भावना शासन दरबारी मी पोहचवतो असे आश्वासन दिले.
