कोरोना योध्यांचे “लसीकरण” प्राधान्याने करणे अत्यंत गरजेचे आहे:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा गेल्या दिड वर्षांपासून रात्रंदिवस झटत आहेत.सर्वचअधिकारी आणि कर्मचाऱ्याना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.त्यांचे सर्वांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहेच,पण त्यांच्याबरोबरच अनेक सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था,समाजसेवक,काही नगरसेवक व कार्यकर्तेही कोरोना योद्धे म्हणून आपापल्या परिने कोरोनाशी लढा देत आहेत.हे काम करत असतांना काही प्रमाणात धोकाही संभवतो.म्हणून या कोरोना योध्यांचे ” लसीकरण” प्राधान्याने करणे अत्यंत गरजेचे आहे.तसे केल्यास या सर्वजण अजून जास्त हिरीरीने काम करतील यात शंकाच नाही.कोपरगाव शहरात “कोरोना वॉर रूमच्या” च्या माध्यमातून सेवा देणारे सर्व युवक,सर्व पत्रकार बंधु व अजूनही असेच काम करणाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय त्वरित घेऊन त्याची अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती अशी मागणी विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना पत्रकाद्वारे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *