माजी आमदार कोल्हेंच्या प्रयत्नांना यश नांदुर मध्यमेश्वर जलद कालवा खोपडी 7 कोटी 71 लाख भूसंपादन मोबदल्याचा प्रस्ताव मार्गी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्या अंतर्गत वितरीका क्रमांक दोन साठी उपवितरीका क्रमांक 4 व 5 करीता तालुक्यातील मौजे खोपडी येथील गट नंबर 62 व अन्य भूसंपादनाचे क्षेत्र खरेदी करून मोबादला निश्चितीचा 7 कोटी 71 लाख 82 हजार 500 रूपयांच्या प्रस्तावाची पुर्तता अहमदनगर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी कार्यालयाकडुन तो गोदावरी खोरे विकास महामंडळ औरंगाबाद कार्यालयास सादर करण्यांत आला आहे त्यामुळे खोपडी परिसरातील शेतक-यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यासाठी आभार मानले आहे. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी याकामी विधीमंडळ स्तरावर अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून लाभार्थी शेतक-यांची अनेक वर्षापासुनची अडचण मांडली होती. यापुर्वी लौकी आणि भोजडे येथील शेतक-यांचा भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढण्यांत आला होता.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे अनेक वर्षापासुन प्रस्ताव त्रुटी पुर्ततेच्या नावांखाली प्रलंबित असल्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे व अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेवुन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांच्यास्तरावर पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे गोदावरी खोरे विकास महामंडळाकडुन कार्यकारी अभियंता नांदुर मध्यमेश्वर जलद कालवा वैजापुर, त्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी अहमदनगर व प्रांताधिकारी शिर्डी, तहसिलदार कोपरगांव स्तरावर सर्व शेरेपुर्तता करून 7 कोटी 71 लाख 82 हजार 500 रूपयांचा प्रस्ताव पुर्ण केला त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांनी नांदुर मध्यमेश्वर जलद कालवा वैजापुर कार्यालयास उपवितरीका क्रमांक 4 व 5 करीता मोबदला निश्चिती बाबतचे प्रपत्र 1, दोन टक्के अस्थापना शुल्क 15 लाख 43 हजार 650 व एक टक्का सोई सुविधा शुल्क 7 लाख 71 हजार 825 ही रक्कम दोन दिवसात या कार्यालयास जमा करावी म्हणून लेखी आदेश काढले आहेत. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्यांने खोपडी लाभधारक शेतक-यांनी माजी आमदार कोल्हे यांचे मनस्वी आभार मानले आहेत. तर धोत्रे, घोयेगांव, वारी अन्य गांवच्या भूसंपादित रक्कमेबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचेही सौ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *