स्व. राजीव गांधी यांचे स्मरणार्थ शासकीय कोविड सेंटरला अन्नदान:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा शहर काँग्रेस चे वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करून देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय मोफत कोविड सेंटरला अन्नदान करणेत आले.


माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने “भव्य मदतकार्य अभियान” राबविले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा काँग्रेस पक्षाचे वतीने सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे स्मरणार्थ अन्नदान करणेत आलेचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
या प्रसंगी जिल्हा कॉंग्रेस चे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत चव्हाण, किरण पठारे, राहुल महांकाळ, चेतन पठारे, अक्षय माळवदे, अस्लम इनामदार, पप्पू पठारे, अक्षय पठारे, अमजद इनामदार, विकास पठारे, अजय खिलारी आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी शासकीय कोविड सेंटरला अन्नदान केले बद्दल काँग्रेस पक्षाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *