
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील मा.माधवरावजी कचेश्वर माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीच्या सदस्य पदी बाळासाहेब सांळुंके यांची निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र आज दि. ३०/११/२०२१ रोजी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा शालेय समिती, एम.के. आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे चेअरमन विजय वहाडणे यांनी दिले आहे.बाळासाहेब सांळुके शिवसेनेच्या माध्यमातुन जनसेवा करत आहे.बाळासाहेब सांळुके कोपरगाव. शिवसेना शहर संघटक पदावर कामकाज करत आहे.त्यांच्या या निवडी प्रसंगी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला आहे.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.बाळासाहेब सांळुके यांनी शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे त्याच बरोबर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे आभार मानले आहे.बाळासाहेब सांळुके यांचा शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी शुभेच्छा देत म्हणाले की, शिक्षक व पालक, विद्यार्थांच्या येणार्या समस्या सोडवाव्या .सांळुके यांच्या निवडीमुळे पालक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे
