
कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- यावर्षी पोर्णीमा दोन दिवस आल्याने. कार्तीक स्वामी दर्शन पर्वकाळही वाढला आहे. भाविकांना स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी आज मदीर खुले करन्यात आले. दुपारी मुक्ताई ज्ञानपिठ प्रमुख- रामानंदगीरी महाराज. यांच्या हस्ते मुर्तीला महाअभिषेक घालन्यात आला. त्यानंतर भाविकांना मंदीरात प्रवेश दिला गेला.

कार्तीक पोर्णीमा कृत्तीका नक्षत्रात महीलांनी कार्तीक स्वामींचे दर्शन घ्यावे, असे पुरानात सांगीतले आहे. दरवर्षी या ठिकानी येथे गर्दी होते. यावर्षी दर्शन पर्वकाळ ता.19 शुक्रवार 1.29 दुपारपर्य़त आहे. आज पोर्णीमा सुरु होताच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सरपंच डाँ धनंजय धनवटे. यांनी भाविकांना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करन्याचे अवाहन केले आहे.

गोदाकाठावर पाच हजार वर्षापुर्वी दगडी बांधकाम असलेले हे मंदीर आहे. मंदीरात पंच धातुची आकर्षक मुर्ती आहे. या मंदीराने गोदावरीचे कित्तेक महापुर अनुभवले आहेत. तरीही मंदीर आज सुस्थीतीत आहे. शिवलीला अमुर्त मध्ये स्वामींचा ऊल्लेख आहे. राजा विक्रमादित्य काळापासुन या मंदीराचा ऊल्लेख केला जात असत. प्रसिद्धी न झाल्याने हे मंदीर प्रकाश झोतात आले नव्हेत. परंतु गेल्या दशकापासुन येथे दरवर्षी कार्तीक पोर्णीमेला यात्रा भरते. यावर्षी कोरोनाचा कहर आहे. तरीही नियम पाळुन भाविकांनी आज मंदीरात जाऊन स्वामींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. आरती मंडळ कार्यकर्ते व्यवस्था पहात आहेत.
