राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलाचे ९२ विद्यार्थी गुणवत्ता यादित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण च्या विद्यार्थ्यांनी अव्वल कामगीरी केली. यंदा या शाळेचे तब्बल ९२ विद्यार्थी गुणवत्ता यादित झळकले. सलग अकराव्या वर्षी या शाळेने राज्यपातळीवरील आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला. पुढील चार वर्षात या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रूपये याप्रमाणे एकूण ४४ लाख रूपये रकमेची शिष्यवृत्ती मिळेल. अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
ते म्हणाले, यंदा परीक्षेचे गुणवत्तेचे (मिरिट) हे आजपर्यंतचे सर्वोच्च आहे. तरीही आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवरील आपला पहिल्या क्रमांक यंदाही कायम ठेवला. या परीक्षेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरूकुलाचे आजपर्यंत एक हजार सातशे बहात्तर विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यांनी आठ कोटी पन्नास लाख छप्पनन्न हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळवली.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल आदिंनी अभिनंदन केले.
—————————चौकट——————————————
नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष विश्वात्मक, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) ः- सलग अकराव्या वर्षी आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकूलाने एन.एम.एम.एस. परिक्षेत राज्यात आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला. विशेष तयारी वर्ग, सुपर नाईट अभ्यासिका, सुवर्ण पहाट अभ्यासिका, स्मार्ट सण्डे उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी दत्तक योजना या सारख्या गुणवत्ता वर्धक उपक्रमांमुळे हे यश मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *