आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना वडझिरे पॉइंट मधून तातडीने पाझर तलाव, बंधारे भरून द्या…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून वडझिरे पॉइंट मधून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे तातडीने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांना दिल्या आहेत.
आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचले आहे त्यामुळे या गावांना उन्हाळ्यात देखील पाण्याची अडचण भासत नाही यामागे आमदार आशुतोष काळे यांची समयसूचकता असून ज्या ज्यावेळी निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्यात येते त्या-त्यावेळी या गावातील साठवण तलाव, बंधारे,गावतळे, केटीवेअर भरून घेण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो आणि त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांचे पाटबंधारे विभागाला सक्त आदेश देखील असतात. त्यामुळे जिरायती गावातील नागरिकांच्या पाण्याच्या चिंता दूर झाल्या आहेत.
सद्यस्थितीत निळवंडे कालव्यांना आवर्तन सुरु आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या व मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होवू नये या काळजीपोटी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, बहादराबाद, रांजणगाव देशमुख आदी गावातील भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांना दिल्या आहेत. सर्व गावातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे केटी वेअर पूर्ण क्षमतेने भरून देवून एकही गाव वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.याबाबत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून त्यांनीही प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक गावातील पाझर तलाव, बंधारे, गावतळे, केटी वेअर पूर्ण क्षमतेने भरलेच पाहिजेत. ज्या ठिकाणी पाणी पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होतील त्याठिकाणी गरज पडल्यास सर्वोतोपरी उपयायोजना करा असेही आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *